Breaking

Tuesday, November 29, 2022

स्वत:चे दोष दुसर्‍यांच्या माथी कसे मारायचे, हे ठाकरेंकडूनच शिकायला हवे, केशव उपाध्येंचा पलटवार https://ift.tt/wKBXCWA

मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फॉक्सकॉन असो, एअरबस असो, मध्यप्रदेशातील उर्जा प्रकल्प असो की, बल्कड्रग पार्क, सॅफ्रान या सार्‍या प्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टो २०२२ रोजी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांना उत्तरे दिली होती, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत. केशव उपाध्येंनी स्वत:चे दोष दुसर्‍यांच्या माथी कसे मारायचे, हे ठाकरेंकडूनच शिकायला हवे, असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला. स्वत: काही करायचे नाही आणि दुसर्‍यांनी केले की, महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करायचा, हे त्यांनाच जमावे. दुसर्‍या कुणाची तशी हिंमतही होणार नाही, असंही उपाध्ये यांनी म्हटलं. फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. हे सुभाष देसाईंनीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगितले होते. शिवाय, उद्योग येण्यासाठी जे मंत्रिमंडळ निर्णय करायचे असतात, ते केले नव्हते. उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 15 महिने घ्यायची नाही आणि आरोप भाजपवर करायचे. केवढी हिंमत?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. राज्यात नवीन सरकार आले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, तर त्यावर शंका उपस्थित करायची. फॉक्सकॉन हा महाविकास आघाडीने घालविलेला प्रकल्प आहे. त्यांना आरोप करण्याचा अजिबात अधिकार नाही, ही वस्तुस्थिती असताना आरोप केले जातात, असंही केशव उपाध्ये म्हणाले. अर्थात आजचा दिवस का निवडला गेला, याचे कारण सापडले आहे. सकाळी महाराष्ट्रात १०,५०० कोटींच्या गुंतवणुकीसाठी जागा दिली गेली आणि लगेच पत्रकार परिषदेचे निरोप दिले गेले. मानलं बुवा या महाराष्ट्रद्रोहींना ! असं केशव उपाध्ये म्हणाले. आमच्यावर टीका करण्याच्या नादात राज्याची बदनामी करू नका, असंही केशव उपाध्येंनी म्हटलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DfgAULH

No comments:

Post a Comment