म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : नालासोपारा येथे एक वर्षाच्या मुलाचा मंगळवारी गोवरामुळे मृत्यू झाला असून, गोवरामुळे मृत्यू झालेल्या मुलांची संख्या ११ (संशयित मृत्यू वगळून) इतकी झाली आहे. लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये गोवराचा प्रादुर्भाव झाल्यास श्वास घ्यायला त्रास होऊन न्यूमोनियामुळे अधिक गुंतागुंत होऊन बालकांना जीव गमवावा लागत आहे. गोवराने आत्तापर्यंत ११ बालकांचे बळी घेतले असून, एका मृत्यूचे निश्चित निदान वैद्यकीय विश्लेषण समितीने केले नसून, उर्वरित आठ बालकांचा मृत्यू हा गोवरामुळे झाला आहे; तर दोन मृत्यू हे मुंबईबाहेरील आहेत. गोवराचा उद्रेक असलेल्या प्रभागांची संख्या वाढती असून, मुंबईतील दहा प्रभागांमध्ये हा संसर्ग फैलावला आहे. नालासोपाऱ्यातील या मुलाला एक महिन्यापासून ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. १२ नोव्हेंबर रोजी त्याला अंगावर पुरळ आला होता. या बाळालाही गोवराची लस दिली नव्हती. १३ नोव्हेंबरला या बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करून चाचण्या करण्यात आल्या होत्या. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्याला सार्वजनिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. गोवरामुळे उद्भवलेला श्वसनाचा त्रास व ब्रॉन्कोन्यूमोनियामुळे या बालकाचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे. लसीकरण न झालेल्या ९० टक्के मुलांमध्ये गोवरचा संसर्ग वाढल्याचे दिसून येते. लहान मुलांप्रमाणे मोठ्या मुलांमध्ये, तसेच गर्भवती महिलांमध्येही हा संसर्ग होताना दिसतो. सर्दी, खोकला, अंगावर पुरळ, १०४हून अधिक ताप अशा स्वरूपाची लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात. डायरियान न्यूमोनिया, तसेच कानात संसर्ग होण्याचा त्रासही उद्भवू शकतो याकडे 'सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालया'तील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी लक्ष वेधले. मंगळवारची स्थिती - रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण - ४२ - रुग्णालयातून डिस्चार्च घेतलेले रुग्ण - ९ - मृत्यू - १ - एकूण गोवरबाधितांची संख्या - २२० - संशयित गोवरबाधित - ३,३७८ दिवसभरातील रुग्ण मस्जिद - २ धारावी - १ वरळी - १ जोगेश्वरी - १ कुर्ला - ३ गोवंडी - २ मालाड - १ गोरेगाव - १ एकूण - १२ गोवररुग्णांसाठी उपलब्ध रुग्णालये - कस्तुरबा रुग्णालय - शिवाजीनगर प्रसूतिगृह - भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली - राजावाडी रुग्णालय, घाटकोपर - शताब्दी रुग्णालय, गोवंडी - भाभा रुग्णालय, कुर्ला - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, बोरिवली - सेव्हन हिल्स रुग्णालय, मरोळ
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OnbRHU6
No comments:
Post a Comment