रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांच्या चौकशीनंतर उद्धव ठाकरे गटाचे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रडावर आले आहेत. साळवी यांना एसीबीने आज येथील कार्यालयात हजर राहण्स सांगण्यात आले आहे. यासाठी शक्तिप्रदर्शन करत ते अलिबागमध्ये रात्री उशिरा दाखल झाले आहेत. आमदार साळवी यांना बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आल्याने रत्नागिरीत खळबळ उडली आहे. मंगळवारी सकाळी ते रत्नागिरी येथून निघाल्यावर त्यांचे विविध ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आले. शिवसेना आमदार राजन साळवी चिपळूणमध्ये दाखल झाल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते राजन साळवी यांच्या स्वागतासाठी बहादूर शेख नाका येथे जमले होते. क्लिक करा आणि वाचा- चिपळूणमधील कार्यकर्त्यांकडून राजन साळवी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. चिपळूणमध्ये दाखल झालेल्या राजन साळवी यांनी दोन वर्षाच्या साईशा लाड या चिमुकलीला उचलून घेत तिचे कौतुक केले. चिपळूण पाठोपाठ खेडमध्येही कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी विविध ठिकाणी साळवी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात चौकशीला निघालेले आमदार साळवी हे शक्तिप्रदर्शन करत ते आज अलिबाग येथे रात्री उशिरा दाखल झाले. क्लिक करा आणि वाचा- आपण गेली चाळीस वर्षे शिवसेनेत आहोत. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. शिवसेनेत मध्यंतरीतरी स्थित्यंतरे झाली, पण मी शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. माझ्याकडून कधीही कोणतेही चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही. कितीही आणि कोणत्याही प्रकारच्या नोटीशी येऊ देत, आपण त्यांना भीक घालत नाही, अशी स्पष्ट व रोखठोक भूमिका राजन साळवी यांनी मांडली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LDrA2cj
No comments:
Post a Comment