Breaking

Tuesday, December 13, 2022

शाईफेक आंदोलनातील कार्यकर्त्याला मोठा दिलासा: तो गंभीर गुन्हा मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश https://ift.tt/JCtMHkY

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांना अटक करण्याबरोबरच पिंपरी चिंडवडच्या पोलीस आयुक्तांना बंदोस्तावर असलेल्या एकूण ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घतला होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री यांनी ही निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर ३०७ हे कलम लावण्यात आले होते. ३०७ हे कलम खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यासाठी लावण्यात येते. हे कलम लावल्यानंतर गुन्हेगारास १० वर्षांपर्यंत कारावस आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले हे कलम मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. क्लिक करा आणि वाचा- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईवरून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मंत्री पाटील यांनी पुन्हा जाहीर माफी मागितली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात मध्यस्थीही केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणात पोलिसांवर केलेली निलंबनाची कारवाई अनाठायी असल्याचे सांगत हे मागे घ्यावे अशी विनंती राज ठाकरे यांनी केली होती. त्याच प्रमाणे शाईफेक चुकीची असली तरी देखील कार्यकर्त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी कलमे लावणे योग्य नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी ही कारवाई देखील मागे घेण्याची विनंती केली होती. आपली ही यशस्वी मध्यस्थी असल्याचेही राज ठाकरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/srcnNQS

No comments:

Post a Comment