: रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कालिदास स्मारक ते अंबाळा मार्गावरील झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रंजना (३३) व मयूर (३०) , अशी मृतकांची नावे आहेत. रंजना आणि मयूर (दोघांची नावे बदलली आहेत) हे दोघेही हिंगणा येथील रहिवासी आहेत. रंजना ही विवाहित होती. तिला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी रंजना व मयूरचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर रंजना मुलांना सोडून मयूरसोबत रामटेक येथे गेली. तेथे दोघेही भाड्याने राहायला लागले. दरम्यान, रंजनाच्या पतीने ती बेपत्ता असल्याची तक्रार हिंगणा पोलिसांत दिली. पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची नोंद केली. नातेवाइकांनी शोध घेतल्यानंतर ती रामटेक येथे मयुर याच्यासोबत राहत असल्याचे त्यांना आढळले. तेथे जात त्यांनी रंजनला परत आणले. मात्र, तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर ती पुन्हा निघून गेली आणि मयूरसोबत राहायला लागली. रंजना आणि मयुर यांच्या दरम्यान सुरू असलेला हा प्रकार गावकऱ्यांना समजला. काही दिवसातच लोक त्यांच्या विषयी चर्चा करू लागले. त्यांची गावात बदनामी झाली. हे रंजना आणि मयुर यांना समजले. बदनामीमुळे दिवसेंदिवस त्यांना राहणे असह्य होऊ लागले. त्यामुळे दोघांनी अगदी टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविण्याचे ठरविले. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद दोघांचेही ठरल्याप्रमाणे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे समजते. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TBNqWxJ
No comments:
Post a Comment