Breaking

Thursday, December 22, 2022

कर नाही त्याला डर कशाला, चौकशीला सामोरे जायला का घाबरता?; रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा https://ift.tt/L5kTEXY

रत्नागिरी : ', तुमचे आडनाव ठाकरे आहे. ज्याला कर नाही त्याला डर कसली?, असे सांगतानाच चौकशीला सामोरे जायला का घाबरता?, असा थेट सवाल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते यांनी करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतल्यानंतर त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातही पडले आहेत. याप्रकरणी चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर यायला हवी अशी मागणीही रामदास कदम यांनी केली आहे. कोणाचे इतके कॉल आले, AU म्हणजे कोण हे कळले पाहिजे, याची चौकशी झालीच पाहिजे असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे. रामदास कदम हे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. आदित्य ठाकरे तुम्ही कशाला घाबरता, ज्याला कर नाही त्याला डर कसला. तुम्ही चौकशीला न घाबरता समोर जायला हवे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली आहे ते अतिशय योग्यच आहे. दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ दे. सगळ्यांना तीस वर्षाच्या तरुणांनी चौकशीला घाबरण्याची गरज काय, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे. क्लिक करा आणि वाचा- आदित्य ठाकरे हे आता घाबरल्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर धादांत खोटे आरोप करत आहेत. खोटे आरोप करत त्यांना बदनाम करून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. मात्र, नगर विकास खात्यामध्ये हस्तक्षेप कोण करत होते, हे खाते कोण चालवत होते हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. क्लिक करा आणि वाचा- शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/u17TCim

No comments:

Post a Comment