Breaking

Wednesday, December 28, 2022

चीनमध्ये हाहाकार, करोनाचा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक; तज्ज्ञ काय म्हणतात? https://ift.tt/O1vI3zG

नवी दिल्ली: सध्या लोकांमध्ये करोना व्हायरसची भीती पुन्हा एकदा वाढली आहे. चीनमध्ये झपाट्याने करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिवसेंदिवस चीनबाबत धडकी भरवणारी माहिती पुढे येत आहे. चीनची करोना परिस्थिती पाहता भारतातही लोकांमध्ये चिंता वाढली आहे. याबाबत केंद्र सरकारसोबतच राज्यातील सरकारही अलर्टवर आहे. वाढती प्रकरणं पाहता लोकांनी पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच सरकारकडून कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तर, नवीन करोना व्हेरिएंटचा संसर्ग दर जास्त आहे, असं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीचे यूरोलॉजिस्ट अनूप कुमार यांनी सांगितले आहे. हेही वाचा - नवीन कोव्हिडचा संसर्ग दर जास्त आहे आणि एक करोना पॉझिटिव्ह व्यक्ती १०-१८ लोकांपर्यंत संसर्ग पसरवू करू शकते. पूर्वीचा प्रकार ५-६ लोकांना संक्रमित करू शकतो. ज्यांना यापूर्वी कोव्हिड झाला आहे किंवा लसीकरण करण्यात आले आहे त्यांनाही पुन्हा कोव्हिड होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून भारत सरकारनेही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. सरकार आपल्या स्तरावर काम करत असून यासंदर्भात मॉक ड्रीलही झाली आहे. मात्र आता जनतेने सरकारला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे, असंही अनूप कुमार यांनी सांगितलं. पण, भारतात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे, हे चांगले लक्षण आहे, असंही ते म्हणाले. हेही वाचा - देशासाठी पुढील ४० दिवस महत्त्वाचे असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. कारण, जानेवारीमध्ये भारतात कोव्हिड-१९ चे रुग्ण झपाट्याने वाढू शकतात, सरकारच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, भारतात संसर्गाची तीव्रता कमी असल्याचंही सांगितलं जात आहे. कोव्हिडची नवी लाट आली तरी संसर्ग झालेल्या लोकांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असेल, असंही सांगितलं जात आहे. अलीकडच्या काळात, Omicron च्या करोना विषाणूच्या BF.7 उप-प्रकारामुळे कोव्हिड-१९ च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. BF.7 च्या प्रसाराचा दर खूप जास्त आहे आणि एक संसर्ग झालेली व्यक्ती तब्बल १६ लोकांमध्ये संसर्ग पसरवू शकतो, असंही सांगितलं जात आहे. हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8EVNzP0

No comments:

Post a Comment