Breaking

Thursday, December 29, 2022

अवैध व्यवसायाची व्हिडिओ क्लिप पाठवा, एक हजार रुपये मिळवा, बुलढाण्यात जनतेला ऑफर https://ift.tt/PBg4CHU

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव मतदार संघात सह संतनगरी शेगावात मागील महिनाभरापासून अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत. दिलीपकुमार सानंदा आा अवैध धंदे बंद करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी पोलीस प्रशासनाला अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदन दिलं आहे. दिलीपकुमार सानंदा यांनी अवैध व्यवसाय बंद न झाल्यास अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या स्थापना दिनी डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलीस प्रशासनाने सानंदा यांना लेखी पत्राद्वारे आश्वासन देत मतदार संघात अवैध व्यवसाय चालणार नाही, या संदर्भात कडक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. सानंदा यांचं नवं अभियान जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची क्लिप जो पाठवेल त्यांच्यासाठी देखील सानंदा यांनी मोठी घोषणा केली आहे. सोबत त्यांनी जो व्यक्ती अवैध धंद्याच्या क्लिप त्यांच्याकडे पाठवेल. संबंधित व्यक्तीचं नाव गुप्त ठेवून त्यांना एक हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा सांनदा यांनी केली आहे. दिलीपकुमार सानंदा यांची जिल्ह्यात जोरदार चर्चा बुलढाणा जिल्ह्यात दिलीपकुमार सानंदा यांच्या आवाहनाची जोरदार चर्चा सुरु आहे. सानंदा यांनी नागरिकांना अवैध व्यवसायाच्या क्लिप त्यांच्याकडे पाठवण्याचं आवाहन केलं आहे. यामुळं सानंदा यांची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. जेव्हापासून राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यानंतर काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानं अवैध व्यवसाय सुरु असल्याचा आरोप दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे. सानंदा यांनी जनतेला व्हिडिओ क्लिप पाठवण्याचं आवाहन केलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YgHefpW

No comments:

Post a Comment