दोहा : फिफा विश्वचषक २०२२ च्या विजेतेपदाच्या लढतीत लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून इतिहास रचला. विश्वचषक विजेता संघ ठरलेल्या अर्जेंटिनाला त्यांच्या फुटबॉल महासंघासाठी ४ कोटी २० लाख रुपये मिळणार आहेत. तर दुसरीकडे, पराभूत फ्रान्स संघाला ३० दशलक्ष डॉलर्स दिले जातील. फ्रान्सने सन २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला त्यावेळी बक्षिसाची रक्कम ३८ दशलक्ष डॉलर्स इतकी होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघावर देखील पडला पैशांचा पाऊस स्पर्धेत खेळाडूंना सर्वच्या सर्व पैशे मिळत नसले तरी देखील अधिकांश हिस्सा त्यांना मिळतोच. तिसऱ्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाला २ कोटी ७० लाख डॉलर्स मिळाले, तर चौथ्या स्थानावरील मोरोक्कोला २ कोटी ५० लाख डॉलर्स मिळाले. सामन्याच्या पूर्ण वेळेपर्यंत दोन्ही संघांचा स्कोअर बरोबरीचा होता आणि दुखापतीचा वेळ संपल्यानंतर स्कोअर ३-३ असा बरोबरीत होता. अर्जेंटिनाचा स्टार गोलकीपर मार्टिनेझने पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन गोल वाचवून मेस्सीचे स्वप्न साकार केले. क्लिक करा आणि वाचा- मेस्सीच्या नावावर खास विक्रम अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी फ्रान्सविरुद्ध अंतिम फेरीत तर उतरलाच, पण मेस्सी फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूही ठरला. मेस्सीचा हा २६ वा सामना होता. त्याने २५ सामने खेळणाऱ्या जर्मनीच्या लोथर मॅथॉसला मागे टाकले. अर्जेंटिनाने तिसरे विजेतेपद पटकावले आज अर्जेंटिनाने आपले तिसरे विजेतेपद पटकावले आहे. पाच विश्वचषक विजेतेपदांसह ब्राझील या यादीत आघाडीवर आहे. क्लिक करा आणि वाचा- विश्वचषक विजेतेपद मिळविलेल्या देशांची यादी ब्राझील, पाच वेळा विजेता- (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२) जर्मनी चार वेळा विजेता- (१९५४, १९७४, १९९०, २०१४) इटली चार वेळा विजेता- (१९३४, १९३८, १९८२, २००६ ) अर्जेंटिना तीन वेळा विजेता- (१९७८, १९८६, २०२२) उरुग्वे दोनदा विजेता- (१९३०, १९५०) इंग्लंड एकदा विजेता- (१९६६) स्पेन एकदा विजेता- (२०१०) क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zjuNJIS
No comments:
Post a Comment