अकोला : मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलेचे सूर या वर्षी अकोल्यात गुंजणार आहेत. यंदाचे १० वे अखिल भारतीय संमेलन ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी, ज्येष्ठ गझलकार यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार उपस्थित राहणार आहेत. गजल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिस लॉन्स इथे हे दोन दिवसीय संमेलन पार पडणार आहे. गझल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी, अकोला यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिध्द कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय गझल संमेलनासाठी राज्य तसेच इतर राज्यांमधून प्रतिथयश तसेच नवोदित गझलकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनात परिसंवाद, मशायरे, गझल गायन मैफिली, गझलवर मुक्तचर्चा, गझल संगम : बहुभाषी गझल मुशायरा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे असे असतील पहिल्या दिवशी कार्यक्रम संमेलनात गझलकार विद्यानंद हाडके यांच्या 'गज़लसरा' तसेच गझलकार किरणकुमार मडावी यांच्या 'जिंदगी भाकरीच्या दबावात आहे' या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता 'समकालीन गझलेत सामाजिक बदलांचे प्रतिबिंब उमटते का ?' या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला आहे. इचलकरंजीचे ज्येष्ठ गझलकार व लेखक प्रसाद कुळकर्णी हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील तर वक्ते म्हणून मुंबईच्या प्रा. सुनंदा पाटील, अमरावतीचे डॉ. अशोक पळवेकर आणि सुदाम सोनुले हे सहभागी होतील. संमेलनाचे आकर्षण असलेला गझल बहार हा मराठी गझल मुशायऱ्याचा कार्यक्रम दुपारी साडे ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. अखेरचे सत्र हे 'गझल गुंजन' या गझल गायन मैफिलीचे असेल. दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम सकाळी १० वाजता 'मुक्तागंण' या मराठी गझलवरील मुक्त चर्चा होईल. तर सकाळी ११ वाजता 'गझल संगम' हा बहुभाषी गझल मुशायरा. उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती, कोंकणी, इंग्रजी या भाषा तर वऱ्हाडी, अहिराणी, गोंडी, आगरी इत्यादी बोलींमधील गझला सादरीकरण केले जाईल. गझलनवाझ भीमराव पांचाळेंच्या गझल गायनाने संमेलनाची सांगता दुपारी दीड वाजता रसिकांना गझल गायन मैफिलीचा आनंद घेता येईल. गझल बहार हा दुसरा मराठी गझल मुशायरा दुपारी अडीच वाजता आयोजित करण्यात आला आहे. तर संमेलनाचा समारोप सांयकाळी ५ वाजता होईल. सुप्रसिध्द व्यंग कवी घनश्याम अग्रवाल या समारोप सोहळ्याचे प्रमुख अतिथी असतील. गज़ल नवाज़ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाने संमेलनाची सांगता होईल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ltHVSQR
No comments:
Post a Comment