रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ टँकर-मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. लालासो खाशाबा शेवाळे असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रत्नागिरी येथे कामाला असलेले लालासो खाशाबा शेवाळे (५८) हे रत्नागिरीच्या दिशेने येत होते. रत्नागिरी येथे कामाला असलेले शेवाळे सुट्टी संपवून हजर होण्यासाठी आपल्या ऑफिसकडे येत होते. याचवेळी एका वळणावर घात झाला आणि एका क्षणात सगळेच होत्याच नव्हतं झालं. ते शासकीय सेवेत कामाला होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेवाळे हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवडे येथील रहिवासी आहेत. क्लिक करा आणि वाचा- या मार्गावरील टँकर रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दिशेने जात होता. तर मोटारसायकलस्वार कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. याचवेळी साखरपा जवळील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ दोन्ही वाहने आली असता मोटारसायकल टँकरवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेने अपघातग्रस्ताला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने आणण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- अपघाताचे वृत्त कळताच साखरपा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक विद्या पाटील, हवालदार किरण देसाई, सागर उगले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्ताला आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदन केल्यावर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FRQ6Wga
No comments:
Post a Comment