नवी दिल्ली : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून सुरु होऊन आता राजधानी नवी दिल्लीत पोहोचली आहे. नवी दिल्लीत यात्रा पोहोचण्यापूर्वी केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यातून आलेली आहे. २४ डिसेंबरला भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पार पडला. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राहुल गांधी यांनी यात्रेला संबोधित केलं आणि पहिला टप्पा संपला. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ३ जानेवारीपासून होणार आहे. दिल्लीतून यात्रा ३ जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करेल. उत्तर प्रदेशात यात्रा फक्त दोन दिवस असली तरी काँग्रेसकडून यात्रा यशस्वी व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावतींसह जयंत चौधरींना आमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना देखील भारत जोडो यात्रेचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न भारत जोडो यात्रेचा दुसरा आणि अंतिम टप्पा ३ जानेवारीपासून सुरु होमार आहे. उत्तर प्रदेशात यात्रा दाखल होणार आहे. काँग्रेसकडून अखिलेश यादव, मायावती, जयंत चौधरी यांच्यासह विरोधी पक्षातील विविध नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. याच दरम्यान काँग्रेसनं एका भाजप नेत्याला यात्रेचं आमंत्रण दिलं आहे. मात्र, याचं वेगळं कारण समोर आलं आहे. भाजपच्या दिनेश शर्मांना निमंत्रण का? काँग्रेसकडून उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते दिनेश शर्मा यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, त्यांना आमंत्रण देण्यामागील कारण वेगळं आहे. दिनेश शर्मा भाजपचे सदस्य असण्यासोबत लखनऊ विद्यापीठाचे प्राध्यापक देखील आहेत. त्यामुळं त्यांना प्राध्यापक म्हणून आंमत्रण देण्यात आलं आहे. दिनेश शर्मांनी मात्र यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही. ३ जानेवारीपासून भारत जोडोचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. अखिलेश यादव, मायावती यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे आरएलडीचे जयंत चौधरी यांनी दुसरे कार्यक्रम नियोजित असल्यानं या यात्रेत सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते अशोक सिंह यांनी सध्या लोकांना त्यांचे विचार मांडण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. भारत जोडो यात्रा लोकांना त्यांचे विचार मांडण्याची संधी देणारा मंच असून तिथं सर्व विरोधी पक्षांना यात्रेत सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आल्याचं अशोक सिंह म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eMRcESy
No comments:
Post a Comment