Breaking

Friday, December 23, 2022

आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशीद अडचणीत, महिलेची पोलिसात तक्रार https://ift.tt/XNCaKYM

ठाणे : आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशीद यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात आता पिटा / पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. गेल्या महिन्यात मुंब्रा येथे वाय जंक्शन येथील उड्डाण पुलाच्या उद्घाटनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा येथील रिदा रशीद यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, यानंतर मुंब्रा येथील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर रिदा रशीद यांच्या विरोधात देखील अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी रिदा रशीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक झाली नव्हती. रिदा रशीद यांना अटक करण्यात यावी यासाठी फिर्यादी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेरील आंबेडकर चौकात उपोषण देखील केले होते. त्यानंतर आता पुन्हा रिदा रशीद यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. मुंब्रा येथे रिदा रशीद एक सामाजिक संस्था चालवतात. त्यांनी गरजू महिलांना गैर कृत्य करण्यासाठी भाग पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रिदा रशीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. रिदा रशीद या मुंब्रा परिसरात काम करतात. त्यांच्याकडे कामाच्या शोधात असलेल्या काही महिला गेल्या होत्या. रिदा रशीद यांनी हॉटेलमध्ये घेऊन जाऊन गैरकृत्य करण्यास पाठवल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. तक्रार करणारी महिला ही घटस्फोटित महिला असून तिला दोन मुले आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीच्या शोधात असलेल्या या महिलेने रिदा रशीद यांची भेट घेतली होती. रिदा रशीद यांनी नोकरी देते म्हणून एका हॉटेलमध्ये जायला सांगितले. त्याठिकाणी या महिलांसोबत गैरकृत्य केले जात होते, असा आरोप संबंधित महिलेने केला. महिलेने सांगितले की आम्हाला हॉटेलचे नाव सांगण्यात आले नाही मात्र आम्हाला हॉटेल मधून घेऊन जाण्यासाठी एक गाडी उपलब्ध करून देण्यात आली होती. मला दोन लहान मुले असल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी नाईलाजाने आम्हाला हे काम करावे लागलं असल्याचे या तक्रारदार महिलेने सांगितले. तक्रारदार महिलेने केलेल्या तक्रारी नंतर मुंब्रा पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रिदा रशीद यांच्या विरोधात रजि. १२०४ भादंवि ३७० (ए), पिटा तसेच पॉक्सो अंतर्गत कलम ४, १०, ६, आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7cCdj3p

No comments:

Post a Comment