Breaking

Sunday, December 25, 2022

पाकिस्तान श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये 'प्रचंड' सत्तानाट्य, नव्या पंतप्रधानांचा शपथविधी ठरला https://ift.tt/Yiy8eAN

काठमांडू : नेपाळच्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस प्रचंड नाट्यमय ठरला. दुपारपर्यंत पंतप्रधान होणार असं चित्र होतं. मात्र, सीपीएन माओवादी केंद्राचे अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड बैठकीतून नाराज होऊन निघून गेले आणि आघाडीतून बाहेर पडण्याचे घोषणा केली. मात्र, नंतर घडलेल्या घडामोडीनंतर पुष्प कमल दहल प्रचंड केपी शर्मा ओली यांचा पक्ष सीपीएन यूएमएल च्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. आता प्रचंड यांचा शपथविधी उद्या होणार आहे. नेपाळच्या राष्ट्रपतींनी पुष्प कमल दहल प्रचंड यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं आहे. राष्ट्रपती कार्यालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. पुष्प कमल दहल प्रचंड यांचा शपथविधी सोमवारी सायंकाळी चार वाजता होणार आहे. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना दहल यांनी खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. प्रचंड यांना १६५ खासदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी सर्व पक्षांना पंतप्रधानपदासाठी दावा करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी आजची मुदत देण्यात आली होती.नेपाळ काँग्रेसची आघाडी आणि केपी शर्मा ओली यांच्या आघाडीकडून देखील दावा दाखल करण्यात आला नव्हता. एकवेळ अशी आली होती की सरकार बनवण्यासाठी कुठलाही पक्ष पुढं येत नसल्याचं चित्र होतं. पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत केपी शर्मा ओली यांच्यासोबत आघाडी केली आणि पंतप्रधान बनले आहेत. सीपीएन- यूएमल, सीपीएन माओवादी सेंटर, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आणि इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर ते पंतप्रधान बनले आहेत. सीपीएन माओवादी सेंटरचे महासचिव केपी ओली शर्मा यांच्या पार्टीच्या पाठिंब्यासह आमच्याक १६५ खासदारांच्या पाठिंब्यांच्या सह्याचं पत्र असल्याचा दावा करत राष्ट्रपतींकडे दावा केला. राष्ट्रपतींना पत्र देण्यासाठी तयारी केली जात असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओळी यांच्या घरी बैठक झाली. बालकोटमध्ये झालेल्या बैठकीत ओली, प्रचंड, आरएसपी अध्यक्ष रवि लामिछाने, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे प्रमुख राजेंद्र लिंगडेन, जनता समन्वयवादी पार्टीचे अशोक राय यांची उपस्थिती होती. पुष्प कमल दहल प्रचंड आणि केपी शर्मा ओली यांच्यामध्ये पंतप्रधानपदाबाबत रोटेशनवर सहमती झाली. पहिल्यांदा प्रचंड पंतप्रधान होतील नंतर ती संधी दुसऱ्या गटाकडे जाईल.नेपाळच्या संसदेच्या २७५ सदस्यांपैकी १६५ खासदारांचा पाठिंबा प्रचंड यांना आहे. नेपाळी काँग्रेसला ८९, सीपीएन यूएमलनं ७८, सीपीएन माओवादीला ३२ जागा मिळाल्या. तर, पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रीय स्वतंत्रता पार्टीला २०, जनता समाजवादी पार्टीला १२ आणि जनमत पार्टीला ६ जागा मिळाल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hiHMdb4

No comments:

Post a Comment