Breaking

Sunday, December 25, 2022

संजय राऊत यांनी मंत्री केसरकरांच्या 'त्या' वक्तव्याची उडवली खिल्ली; म्हणाले, हा निव्वळ विनोद https://ift.tt/6wIdq0S

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जर आमच्याबरोबर आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी त्यांची घुसमट होते ती सगळ्यांनी बघितलेली आहे. असा उमदा नेता जर कोणाबरोबर असेल तर कोणाला आवडणार नाही?, अशी प्रतिक्रिया एका प्रश्नाला उत्तर देताना यांनी व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे यांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. दीपक केसरकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिलेली शिंदे गटात येण्याची खुली ऑफर हा निव्वळ विनोद आहे, अशी टिप्पणी करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सूचित केले. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पक्षबांधणीसाठी खासदार संजय राऊत हे आज २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या निष्ठा या कायम बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या चरणाशीच राहिल्या आहेत. हा संजय राऊत आहे, मरेल पण शिवसेना सोडणार नाही, अशा खमक्या शब्दात खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत विरोधकांना टोला लगावला आहे. दोन-चार पळपुटे गेले, मात्र शिवसेना जाग्यावर आहे. आम्ही विक्रमवीर आहोत आणि इकडचा सामना आम्हीच जिंकणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत विरोधकांवर हल्लाबोल करताना म्हणाले, दोन चार पळकुटे गेले मात्र शिवसेना जाग्यावर आहे. आम्ही विक्रमवीर आहोत आणि इकडचा सामना आम्हीच जिंकणार असल्याचा विश्वास राऊतांनी त्यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना प्रत्युत्तर देत मुंबईमध्ये दाखवण्यासारखे आहे आणि ते म्हणजे शिवसेनेची ताकद असा टोला लगावला. 'संजय राऊत मरेल, पण शिवसेना सोडणार नाही' मला बाळासाहेबांनी बोट धरून राजकारणात आणले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रमुख राजकीय नेत्यांचे मला आशीर्वाद लाभलेले आहेत. पण माझ्या निष्ठा ह्या कायम बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या चरणाशीच राहिल्या आहेत. हा संजय राऊत आहे, मरेल पण शिवसेना सोडणार नाही. शरद पवार हे राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलताना शब्द जपून वापरावेत. मला एवढेच म्हणायचे आहे की आज जी आवाहने देतात ती उद्या विधानभवनात असतील की नाही याची शंका वाटत असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. नवी मुंबई येथील ऐरोली टोल नाक्यावर संजय राऊत यांचे आगमन होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जलोशात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते नवी मुंबईतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखांचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये कोपरखैरणे सेक्टर ३ येथील रूम नंबर २६७ - मधुकर राऊत यांच्या शाखेचे उदघाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सेक्टर -६ येथील विजयानंद माने, सेक्टर -८ येथे किरण हिणुकले, रवींद्र म्हात्रे आणि सेक्टर -१५ येथे विजय शेट्टी यांच्या शाखांचे उद्घाटन राऊतांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोपरखैरणे सेक्टर -२२ येथील भूमिपुत्र मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या धर्मवीर क्रिकेट चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संजय राऊत यांच्या हस्ते पार पडला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bWxjLaM

No comments:

Post a Comment