अकोला : चक्क ३० हजार रुपयांची सुपारी देवून पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचला आणि आत्महत्या असल्याचं भासवलं. आता ही बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या पुंडा गावातील ही घटना आहे. सचिन घमराव बांगर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर डिगांबर प्रभाकर मालवे असं मारेकरी आरोपीचं नाव आहे. आणि कंचन सचिन बांगर असं सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम पुंडा इथे सचिन बांगर यांचा व्यायम करणाऱ्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. ही घटना २८ डिंसेबर रोजी सकाळी ८ उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा केला असता सचिनच्या अंगावर जखमा तसेच दोरीने बांधल्याचे वण दिसून आले. पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा संशय आला. पोलिसांनी त्यानंतर अधिक चौकशी सुरू केली आणि वैद्यकीय अहवालासह पोलीस तपासात सचिन याची हत्या झाल्याचे समोर आले. पोलीस तपासावेळी सचिनची पत्नी कंचन हिची बारकाईने चौकशी झाली. चौकशीत धक्कादायक बाब उघडकीस आली. पत्नीनेच पती सचिन याच्या हत्येचं कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झालं. सद्यस्थितीत दहीहंडा पोलिसांनी पत्नी कांचन आणि एका आरोपीला म्हणजेच मारेकऱ्याला अटक केली आहे. उद्या शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पतीच्या हत्येसाठी दिली ३० हजाराची सुपारी मृत सचिन घमराव बांगर पास्टूल येथील रहिवासी असून त्याचे अकोट तालुक्यातल्या ग्राम पुंडा येथील कंचन हिच्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेले. सचिन याला दारूचे व्यसन असून व्यसनाआहारी तो पत्नी कंचन हिला सतत मारहाण व शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. तेव्हापासून म्हणजे मागील अडीच वर्षापासून कंचन ही माहेरी पुंडा राहायला गेली. तिथेही पुन्हा सचिनचा त्रास सुरू झाला. अखेर या सर्व त्रासाला पत्नी म्हणजे कंचन त्रासली आणि पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पुंडा गावातील शेजारी राहणाऱ्या डिगांबर प्रसार मालवे याला माझा पती सचिनला जिवे मारून टाक, तुझ्या मुलीलाही त्याचा त्रास आहे, असे म्हटलं. याशिवाय ३० हजार रुपये देते असे आमिष दिले. त्यानंतर दिगंबर याने कंचन हिच्या राहत्या घरी सचिनची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यांनतर त्याचा मृतदेह गावाच्या बाहेरील मुलांचे व्यायाम करण्याचे लोखंडी अँगलला बांधून लटकवून गळफास घेतला असल्याचे भासवले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GbjnsJp
No comments:
Post a Comment