रबात : कतारमध्ये झालेल्या २०२२ च्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. अर्जेंटिनानं ३६ वर्षानंतर विश्वविजेतेपद पटकावत इतिहास रचला. यामुळं दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं. मात्र, या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती मोरक्कोच्या टीमची. पहिला आफ्रिकन संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याचा मान त्यांना मिळाला. मोरक्कोच्या टीमला फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. तरी देखील मोरक्कोचे नागरिक आपल्या टीमच्या खेळाडूंच्या स्वागताला रस्त्यावर उतरले होते.मोरक्कोला उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत क्रोएशियानं मोरक्कोचा पराभव केला होता. मात्र, सेमी फायनलपर्यंत धडक मारणाऱ्या मोरक्कोच्या टीमच्या कामगिरीवर देशातील नागरिक समाधानी होते. आपल्या देशाची फुटबॉल टीम मायदेशी परतल्यावर त्यांच्या स्वागताला रस्त्यावर जनसागर लोटला होता. मोरक्कोमधील रबात शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये खेळाडूंची मिरवणूक काढण्यात आली. मोरक्कोचे देशवासीय आपल्या लाडक्या खेळाडूंची एक छबी टिपण्यासाठी आतूर झाला होता. देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंच्या स्वागताला मोठा जनसागर लोटला होता. सर्व जण नाचत होते, आनंद साजरा करत होते. मोरक्कोच्या जनतेकडून झालेल्या स्वागतामुळं लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण होतंफुटबॉल संघाचे प्रशिक्षक वालिद रेगरागुई देशभरातील नागरिकांना अभिवादन करत होते. खेळाडूंची मिरवणूक एका शाही परेड महालापर्यंत काढण्यात आली. तिथं राजा मोहम्मद पंचम खेळाडूंच्या स्वागताला उभे होते . अर्जेंटिनामध्ये देखील जनसागर रस्त्यावर अर्जेंटिना देश विजेतेपद पटकावल्यानंतर अगदी जल्लोषात बुडाला होता. नजर जावी तिथे रस्त्या-रस्त्यावर लोक आनंद साजरा करताना दिसत होते. देशाचा झेंडा आणि संघाची जर्सी घालत एकच जल्लोष अर्जेंटिनामध्ये पाहायला मिळत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1Nlm8fa
No comments:
Post a Comment