मुंबई : विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाकडून चंदन चित्रपटगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर जेव्हीपीडी सर्कल येथे उड्डाणपूल उभारण्याचा मुहूर्त अखेर महापालिकेला सापडला आहे. या पुलासाठी ३५० कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक पालिकेने केले होते. मात्र प्रत्यक्षात निविदा प्रक्रियेनंतर पुलाच्या खर्चात १५ टक्क्यांनी म्हणजे ६४ कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे सुधारित खर्च आता ४१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.एस. व्ही. रोड, विलेपार्ले येथून कूपर रुग्णालयामार्गे पश्चिम द्रुतगती मार्ग ते अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पुलावरून पुढे जेव्हीपीडी सर्कलमार्गे वर्सोवा, सात बंगला व लिंक रोडने लोखंडवाला संकुलात पोहोचता येते. तेथून ओशिवरा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली व दहिसर या पश्चिमेकडील भागात जाण्यासाठी जेव्हीपीडी सर्कल हा जवळचा मार्ग आहे. या सर्कलजवळ होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांची रखडपट्टी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी पालिकेचे तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत आवाज उठवला होता.पालिकेने या सर्कलवर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून त्याचा मार्ग काही प्रमाणात बदलण्यात आला आहे. सी. डी. बर्फीवाला मार्ग ते जुहू-वर्सोवा मार्गापर्यंत अस्तित्वात असलेल्या रस्त्यालगत उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र प्रस्तावित ‘मेट्रो मार्ग २-बी’चे काम गुलमोहर रस्त्यापर्यंत सुरू असल्याने व जेव्हीपीडी जंक्शनवर मेट्रो स्थानक प्रस्तावित असल्यामुळे त्या मार्गावर उड्डाणपूल बांधणे शक्य नसल्याचे पालिकेला आढळून आले. त्यामुळे उड्डाणपुलाजवळ उपलब्ध असलेल्या भारतीय विमान प्राधिकरणाच्या अखत्यारितील जागेतून पुलाला मार्ग देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले.३३ टक्के जादा दराने निविदाया पुलासाठी पालिकेने ३५० कोटी रुपये खर्च येईल, असे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराने ३३ टक्के जादा दराने निविदा भरली. त्यामुळे पुलाचा खर्च ४६६ कोटी रुपयांवर गेला. अखेर कंत्राटदाराशी वाटाघाटी करून बांधकामाचा खर्च ४१४ कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात पालिकेला यश आल्याने पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SNy6VWq
No comments:
Post a Comment