नवी दिल्ली: अंतराळातील गोष्टींबाबत आवड असणाऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे. लवकरच असं काही होणार आहे जे गेल्या ५० हजार वर्षात कधीही झालेलं नाही. अंतराळात एक अशी घटना घडणार आहे जी अत्यंत रंजक असणार आहे. एक विशाल धूमकेतू सूर्याजवळून होऊन पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणार आहे. हा धूमकेतू पृथ्वीच्या इतक्या जवळून जाईल की तुम्ही डोळ्यांनी त्याला पाहू शकाल. हा धूमकेतू १ फेब्रुवारीला पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हा पाहायचा असेल तर तुम्ही टेलिस्कोपने त्याला आणखी जवळून पाहू शकाल. हा धूमकेतू ५० हजार वर्षात पहिल्यांदाच पृथ्वीच्या इतक्या जवळ येणार आहे. जर त्या दिवशी पूर्ण चंद्र निघाला तर हा धूमकेतू दिसण्याबाबत संशय आहे. याचा शोध अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या ज्विकी ट्रांझीएंट फॅसिलीटीने लावला आहे. याला पहिल्यांना गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुरु ग्रहाजवळून जाताना पाहण्यात आलं होतं. या धूमकेतूचं नाव C/2022 E3 (ZTF) ठेवण्यात आलं आहे. धूमकेतू हे बर्फ, गॅस आणि दगड यांच्यापासून बनला असतो, त्यातून हिरव्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित होतो, असं खगोलीय शास्त्रज्ञ निकोलस बीवर यांनी सांगितलं. हेही वाचा - या धूमकेतूचा व्यास एक किलोमीटर हा NEOWISE म्हणजेच उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या अखेरच्या धूमकेतूपेक्षा लहान आहे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. हा धूमकेतू मार्च २०२० मध्ये पृथ्वीजवळून गेला होता. तर Hale-Bopp ६० किलोमीटर व्यास असलेला धूमकेतू जो १९९७ मध्ये दिसला होता. त्यापेक्षा C/2022 E3 (ZTF) हा धूमकेतू लहान असणार आहे. पण, हा अधिक प्रकाशमान असेल असं सांगण्यात येत आहे. यातून निघणारा प्रकाश हा रात्रीतही दिवसाचा अनुभव देईल. उत्तरी गोलार्धात सकाळच्या वेळी हा आकाशात दिसेल. हेही वाचा - हा धूमकेतू Oort Cloud येथून येत असल्याचं मानलं जात आहे. हे सूर्य मालेच्या चौफेर असलेलं एका विशाल क्षेत्र आहे. जिथे रहस्यमयी बर्फाच्या वस्तू आहेत. हेही वाचा -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6XGCziY
No comments:
Post a Comment