Breaking

Friday, January 6, 2023

घरी कालवणाचा बेत ठरला, लातूरचा तरुण तळ्यावर मासे पकडायला गेला आणि तिथेच... https://ift.tt/8teuFMg

लातूर : हवामानात बदल झालाय, थंडी पण अधिकच बोचतेय अशा वातावरणात काहीतरी चमचमीत खाऊ वाटतंय, म्हणून घरी माशाच्या कालवणाचा मस्त बेत आखून तरुण तळ्यावर मासे पकडायला गेला. मासे तर गळाला लागले नाहीत, मात्र दोन अज्ञात तरुणांनी याचीच शिकार केली. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत कत्तीचा धाक दाखवून तरुणाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर खिशातील रोख रक्कम सहा हजार २२० रुपये काढून घेत चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना काल सायंकाळी लातूर शहराजवळ असणाऱ्या पाखरसंगवी शिवारात घडली. पीडित तरुणाने तात्काळ एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दिली. संबंधित तरुणांचे वर्णनही त्याने केले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् मारहाण करणाऱ्या चोरट्यांच्या वर्णन व चेहरेपट्टीवरून अवघ्या दोनच तासात त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी केलेल्या रोख रकमेसह कत्ती आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. पखरसंगवी शिवारातील स्वराज्य नगरमधील 23 वर्षीय सिद्धार्थ विजय कांबळे आणि स्वराज्य नगरमधील वडार गल्लीतील 23 वर्षीय किशोर विनायक जाधव अशी या चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा : पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेवरून अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक डाके, लोखंडे ,सहायक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार भीमराव बेल्हाळे ,अर्जुनसिंग राजपूत, गोविंद चामे, सिद्धेश्वर मदने, ईश्वर तुरे, महेश गाडे, राम जाधव या पोलीस पथकाने ही गतिमान कारवाई केली. हेही वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LXWpRgc

No comments:

Post a Comment