राजकोट: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेत भारताने २-१ अशा फरकाने शानदार विजय मिळवला आहे. राजकोट येत्या खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ९१ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी आपली दमदार खेळी दाखवलीच पण सोबतच या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे सुर्यकुमार यादव. सूर्याने आपल्या बॅटमधून आज ५१ चेंडूत नाबाद ११२ धावांची वादळी खेळी केली. सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. २०२३ च्या पहिल्या डावात तो अपयशी ठरला. मात्र दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकल्यानंतर तिसऱ्या डावात त्याने शतक झळकावले. राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्याने ९ षटकार आणि ४ चौकार मारत ११२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने निर्णायक सामन्यात श्रीलंकेसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. शतक झळकावल्यानंतर सूर्या काय म्हणाला या खेळीमुळे खूप आनंदी असल्याचे सूर्यकुमार यादवने शतकी खेळीनंतर सांगितले. या खेळीनंतर तो ब्रॉडकास्टर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'ज्या प्रकारे डाव सुरु होता, त्यामुळे मी खूश आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन कर्णधाराने फलंदाजांवर विश्वास दाखवला. सूर्याची खासियत म्हणजे 360 डिग्री शॉट्स खेळणे. यावर त्याला विचारण्यात आले की कोणता शॉर्ट खेळायचा हे आधीच ठरवतो का?, संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव यावर म्हणाला, 'काही शॉट्स आधीच ठरलेले असतात, पण हे असे शॉट्स आहेत जे मी गेल्या एक वर्षापासून खेळत आहे आणि मी काही वेगळे करत नाही. २०२२ चा फॉर्म नाहीसा झाला आहे, २०२३ मध्ये ही एक नवीन सुरुवात आहे आणि मला आशा आहे की चांगल्या फॉर्मसह मी अशीच कामगिरी कायम ठेवू.' टी-२० मध्ये तिसरे शतक सूर्यकुमार यादवचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे. त्याने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये शतक झळकावले होते. टी-२० विश्वचषकानंतर त्याने न्यूझीलंड दौऱ्यावरही शतक झळकावले. आता त्याने भारतात तिसरे शतक झळकावले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन किंवा त्याहून अधिक शतके करणारा सूर्या हा केवळ ५वा फलंदाज आहे. त्यांच्याशिवाय रोहित शर्माने ४ तर न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि झेक प्रजासत्ताकच्या सबावून द्विजी यांनी तीन शतके झळकावली आहेत. त्याने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे सर्वात वेगवान आणि भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान शतक आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PmEcIM4
No comments:
Post a Comment