Breaking

Monday, January 16, 2023

भरधाव दुचाकी स्पीडब्रेकरवरुन उडाली, भिंतीवर आदळली; जळगावात दोन मित्रांचा करुण अंत https://ift.tt/94r8P2h

जळगाव: भुसावळ तालुक्यातील महामार्गावरील कोहूरखेडा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाच्या भिंतीवर आदळल्याने अल्पवयीन मुलगा जागीच मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाली. ही घटना सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. सुरज रामदास तांबे (वय-१५, रा. काहुरखेडा ता. भुसावळ ) आणि सुनिल विठ्ठल भालेराव (वय-२०, रा. वघारी ता. जामनेर) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.दोन मित्र भरधाव दुचाकीवरुन जात असताना अपघातसुरज तांबे आणि सुनिल भालेराव हे दोघे मित्र सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ डी १६००) ने भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा फाट्याजवळून भरधाव दुचाकीने जात होते. त्यावेळी स्पीडब्रेकरवरून वाहन आदळल्याने दुचाकीस्वार सुनिल भालेराव याचे दुचाकीवरील ताबा सुटल्यानंतर भरधाव दुचाकी थेट नजीकच्या पुलावरील भिंतीवर आदळली.हेही वाचा - सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत, जागीच मृत्यूया अपघातात सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनिल भालेराव याला उपचारासाठी नेत असतांना त्यांचाही जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत बोहार्डीचे पोलीस पाटील साहेबराव शांताराम पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय बाविस्कर करीत आहे.हेही वाचा -चंद्रपुरात तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यूदुसरीकडे चंद्रपुरात शेतातून बैलगाडीवरून कापूस भरून आणताना एक तरुण शेतकरी पडला आणि त्याच्या छातीवरुन बैलगाडीचा चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. बैलगाडी जात असताना समोरून रानडूकराचा कळप आला. यामुळे बैल बुजाळले आणि तरुण शेतकरी बैलगाडीवरुन थेट खाली कोसळला. यानंतर त्याच्याच बैलगाडीचे चाक त्याच्या छातीवरून गेले. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले. मात्र, चंद्रपूरला नेत असताना या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/upVFyI9

No comments:

Post a Comment