Breaking

Thursday, January 19, 2023

सोयाबीनच्या भावात वाढ, चांगल्या दरासाठी शेतकऱ्यांचं वेगळं धोरण, जाणून घ्या दर https://ift.tt/9cQPHOY

वाशिम: महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरात वाढ झाली असली तरी अपेक्षप्रमाणं दर नसल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलेलं नाही. वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनच्या दरात आज आवक घटली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक वामन सोळंके यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. वाशिममधील सोयाबीनचा आजचा कमाल दर हा ५६२५ रुपये क्विंटल इतका होता. सोयाबीनच्या दरात २३ रुपयांची किरकोळ वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणलं नाही. वाशिमधील सोयाबीनचे दर कसे होते?मागील आठवाड्यात सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र असताना दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर साडेपाच हजाराच्या आसपासच्या स्थिर झाले आहेत. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला किमान ४७५० ते कमाल ५६२५ रुपये दर मिळाला. मात्र, दर वाढत नसल्याने आवक घटली आहे.आज फक्त ४४९१ क्विंटलची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. काल ५६०२ रुपये इतका दर मिळाला होता. आज २३ रुपयांची किरकोळ वाढ झाली. मात्र, शेतकऱ्यांना किमान सात ते साडेसात हजार दर अपेक्षित असल्याने आवक घटली आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम बाजार भाव क्विंटलमध्ये सोयाबीन दर ४७५०-५६२५चना ३८५०-४५५०तूर ६२००-७२००उडीद ४५००-५५५०मुंग ५५००-६०५०गहू १९००-२८००ज्वारी १६००-२०५० दोन दिवस बाजार समिती बंद राहिल्यानंतर काल सोयाबीनची आवक वाढली आहे. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत दर स्थिर असल्यानं बुधवारी सोयाबीनला ४७५० ते ५६०२ इतका दर मिळाला होता. तुरीच्या दराची काय स्थिती? तुरीला मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी सुरवातीलाच चांगले दर मिळत आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे तूर पीक नष्ट झाले होते. ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत धुई (धुके) मुळे तूर करपली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. आज वाशिम बाजार समितीत तुरील ६२०० ते ७२०० दर मिळाला आहे. शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन सोबत तुरीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HwGXmbc

No comments:

Post a Comment