कोलकाता : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यासह मालिका जिंकली. पण या विजयानंतर भारताच्या एका अनुभवी खेळाडूची कारकिर्द आता संपणार असल्याचे समोर आले आहे. कारण या सामन्यातील विजयानंतर त्याला भारताच्या पुढील वनडे सामन्यांमध्ये संधी मिळेल, अशी शक्यता दिसत नाही.भारताने पहिल्या वनडेत विजय मिळवला होता. पण त्यावेळी गोलंदाजीत काही चुका झाल्या होत्या आणि त्याचा फटका भारताला बसला होता. कारण भारतीय संघ या सामन्यात मोठा विजय मिळवेल, असे वाटत होते. पण भारताला श्रीलंकेच्या संघाला ऑल आऊट करताच आले नाहीत. त्यामुळे रोहित शर्माने या पहिल्या सामन्यातील चुक दुसऱ्या सामन्यात सुधारली आणि तीच गोष्ट आता भारताच्या या खेळाडूसाठी वाईट ठरली आहे.दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाने एक मोठा बदल केला. दुसऱ्या वनडेसाठी कुलदीप यादवला संघात स्थान दिले. कुलदीपने या संधीचे सोने केले. कारण या सामन्यात कुलदीपने तीन विकेट्स घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्याचबरोबर कुलदीपने यावेळी श्रीलंकेच्या फलंदाजांना क्लीन बोल्डही केले, याचा अर्थ कुलदीपची या सामन्यात गोलंदाजीची दिशा आणि टप्पा या दोन्ही गोष्टी योग्य होत्या. त्यामुळे आता तिसऱ्या वनडेतही त्याला संधी मिळू शकते. कुलदीपला दुसऱ्या वनडेत संधी दिली होती ती युजवेंद्र चहलच्या जागी. पहिल्या वनडेत युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार श्रीलंकेच्या फलंदाजांनी घेतला होता. चहलला एक विकेट मिळाली होती खरी, पण त्यावेळीही फलंदाजाने मोठा फटका मारला होता. त्यामुळे रोहितने दुसऱ्या वनडेत चहलला संघाबाहेर केले आणि हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता यापुढे चहलला वनडे संघात स्थान मिळवणे कठीण झाले आहे. चहलला भारताच्या टी-२० संघात कायम ठेवले जाऊ शकते. पण त्याला वनडेमध्ये संधी मिळेल, याची शाश्वती आता कोणीच देऊ शकत नाही. भारतीय निवड समिती आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी वेगवेगळ्या खेळाडूंनुसार संघ बांधायचा विचार करत आहे. निवड समितीने टी-२० संघाला कर्णधार बदलत ही गोष्ट दाखवून दिली आहे. त्यामुळे आता चहल फक्त भारताच्या टी-२० संघापुरताच मर्यादीत राहू शकतो, असे संकेत या सामन्यानंतर मिळत आहेत. त्यामुळे आता वनडेमध्ये अक्षर पटेल आणि कुलदीप यादव ही जोडी या पुढीस काही सामन्यांमध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळे चहलची वनडे कारकिर्द आता धोक्यात आली आहे, असे म्हटले जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zIULtlj
No comments:
Post a Comment