: अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. ७ वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि ९ वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज असे या दोन्ही मयत मुलांची नावे आहेत. मृत मुले ही आज सायंकाळी मन नदीकाठी खेळत होती. अचानक त्यांचा तोल जाऊन पाय घसरला आणि नदीत बुडाली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेनंतर बाळापूर शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण घटना? अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून 'मन' नदी वाहते. या नदीच्या काठावर अनेक घरे तसेच वस्त्या आहेत. या परिसरातील अनेक लहान मुले नदीकाठावर खेळत असतात. नेहमीप्रमाणे म्हणजे काल रविवारी सांयकाळी काही मुले नदीकाठावर खेळत असताना यातील दोन लहान मुलांचा तोल जाऊन म्हणजे पाय घसरल्याने नदीत बुडाली.क्लिक करा आणि वाचा- याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी नदीकाठी धाव घेतली आणि नदीत उड्या घेतल्या. नदीत शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू झालं. मात्र तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. दोन्ही लहान मुलांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले अन् वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. तसेच या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला. तसेच संबधित प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान कुटुंबीयांसह नागरिकांनी बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि लागलीच नदीच्या काठावर आवार भिंत उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी दाद पोलिसांकडे केली. बाळापूर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले घटनास्थळी दाखल झाले होते.क्लिक करा आणि वाचा- नदीच्या काठावर आवार भिंत उभारण्याची मागणीबाळापूर शहरातील मन नदीकाठावर अनेक घर आहेत आणि या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे नदी काठावर आवार भिंत उभारण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर पोलीस प्रशासनासह तहसील प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने संयुक्त बैठक बोलावली आणि नदी काठावर आवार भिंत उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असल्याचे समजते. क्लिक करा आणि वाचा-दरम्यान मन नदीच्या पुलावरही सुरक्षा कठडे नसल्याने भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पूर्वी इथेही नदीच्या पुलावर सुरक्षा कठडे उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xFZVsbh
No comments:
Post a Comment