Breaking

Thursday, January 19, 2023

...तर शुभमन गिलसारखा हिराच सापडला नसता, दिग्गज खेळाडूने हेरलं अन् आयुष्य बदललं https://ift.tt/f8noOQZ

नवी दिल्ली : शुभमन गिलची सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरु आहे. द्विशतकानंतर गिल हा जगभरात प्रसिद्ध झाला आहे. पण गिलसारखा हिरा हा आपल्याला दिसलाच नसता. कारण गिल फक्त स्थानिक क्रिकेट पुरता मर्यादीत होता. तो फक्त अकादीमध्येच खेळत होता. त्यामुळे तो भारतीय संघात येईल, असे त्यावेळी बऱ्याच जणांना वाटत नव्हते. पण हा चम्तकार घडला तो भारताच्या एका दिग्गज खेळाडूमुळे.गिलचे वडिल शेती करायचे. पण त्यांना क्रिकेटचे वेड होते. आपला मुलगा क्रिकेटपटू व्हावा हे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी शेतीमध्येच मैदान तयार केले. शुभमनला त्याचे वडिल सुरुवातीला शिकवत होते. त्यानंतर शुभमन मोठा झाल्यावर गावातील मुलांना त्यांच्या या मैदानात बोलावले जायचे आणि गिलचा स्तर थोडा उंचावला. गिल एका छोट्या गावात राहत होता. त्यामुळे त्याला जर भारताकडून खेळायचे असेल तर त्याला तिथे राहून चालणार नव्हते. त्यासाठी वडिलांनी त्याला शहरातील एका अकादमीमध्ये खेळायला पाठवले. घरापासून लांब नको म्हणून आपले कुटुंब ते शहरात घेऊन गेले आणि भाड्याच्या घरात ते राहत होते. आणि तिथेच गिलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.अकादमीमध्ये गिलचा चांगलाच जम बसला. पण त्याला त्यावरील स्तरावर खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्यावेळी टॅलेंट सर्च करण्यासाठी भारताचे माजी खेळाडू करसन घावरी या अकादमीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी गिलचा खेळ पाहिला आणि त्याच्यामध्ये घावरी यांना चमक दिसली. त्यामुळे घावरी यांनी गिलची निवड केली आणि त्याला त्यांनी त्या अकादमीमधून बाहेर काढले आणि मोठ्या स्तरावर खेळायला घेऊन गेले. गिलसाठी ही एक चांगली संधी होती आणि गिलने या संधीचे सोने केले. गिलने या संधीनंतर मागे वळून पाहिलेच नाही. कारण त्याच्या कामगिरीचा आलेख चढताच राहीला. फार कमी वयात त्याने बऱ्याच जणांना आपल्या खेळाच्या जोरावर भूरळ पाडली होती. त्यानंतर गिल भारताच्या १९-वर्षांखालील संघासाठी निवडला गेला आणि त्यानंतर गिल हा आता आपल्याला भारताच्या संघात दिसत आहे. त्यामुळे गिलला जर करसन घावरी यांनी हेरले नसते तर हा हिरा आपल्याला पाहायलाच मिळाला नसता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/J2yoEwK

No comments:

Post a Comment