Breaking

Monday, January 30, 2023

कोल्हापुरहून आलेली महिला गणपतीपुळे समुद्रात बुडू लागली, पतीने केली आरडाओरड, इतक्यात... https://ift.tt/hVuc0JE

: कोकणातील समुद्रकिनारी येणारे पर्यटक समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. अशीच एक घटना गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी घडता घडता टळली. येथील मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या जीवरक्षकांच्या प्रसंगावधानतेमुळे तीस वर्षीय महिलेचा जीव वाचला आहे. हे वेळेवर आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शसाठी येथून आलेल्या प्रियांका बालाजी सपाटे (३०, मंगळवारपेठ, ता. जि. कोल्हापूर) या दुपारी १ वाजता समुद्राच्या पाण्यात आंघोळ करत होत्या. मात्र त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. यावेळी जवळच असणारे त्यांची पती बालाजी सपाटे यांनी आरडाओरडा केला. यावेळी तेथे असले जीव रक्षकांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्लिक करा आणि वाचा- येथील जीवरक्षक पोलीस व मोरया वॉटर स्पोर्टच्या मदतीने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या रूग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करून सायंकाळी सोडून देण्यात आले व सपाटे कुटुंबिय कोल्हापूरकडे रवाना झाले. क्लिक करा आणि वाचा- या महिलेला वाचविण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत जीवरक्षक गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस नाईक प्रशांत लोहारकर, पोलीस शिपाई सागर गिरी गोसावी, मोरया वॉटर स्पोर्ट यांनी मेहनत घेतली.क्लिक करा आणि वाचा- मोरया स्पोर्ट जीवरक्षकांमुळे अनेकांचे वाचले प्राणगणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर याआधीही आशा काही घटना घडल्या आहेत मात्र किनाऱ्यावर मोरया स्पोर्टचे जीवरक्षक सदैव सतर्क असतात त्यांच्यामुळे आजवर अनेकांचे जीव वाचले आहेत. कोकणात पश्चिम महाराष्ट्रातले अनेक पर्यटक समुद्र किनाऱ्यावरवरती पर्यटनासाठी येत असतात मात्र समुद्राचा अंदाज न आल्याने अशा घटना अनेकदा घडत असतात. त्यामुळे समुद्र स्नानाला जाताना पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष देणं आवश्यक आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JPGvqiH

No comments:

Post a Comment