भुवनेश्वर : ओडिशामध्ये सुरु असलेल्या हॉकीच्या वर्ल्डकपमधील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या क्रॉस ओव्हर मॅचमध्ये भारताला न्यूझीलंडकडून प्रवास स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा विजय मिळवला. नियमित वेळेत दोन्ही संघांनी ३-३ गोल केले होते. त्यामुळं मॅचचा निर्णय पेनल्टी शूट आऊटमध्ये गेला. तिथं पराभव स्वीकारावा लागल्यानं टीम इंडियाचं दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. भारतानं १९७५ मध्ये विश्वकप जिंकला होता. तब्बल ४८ वर्षानंतर निर्माण झालेली संधी आजच्या पराभवामुळं हातून निसटली आहे. भारतानं सुरुवातीला सामन्यावर पकड मिळवली होती. भारताकडून ललित उपाध्याय, सुखजीत सिंह आणि वरुण कुमार यांनी गोल केले. न्यूझीलंडकडून सॅम लेन, केन रसेल आणि सीन फिंडले यानं गोल केला. भारताची टीम लीग स्टेजमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिल्यानं क्रॉसओव्हर लढतीत उतरावं लागलं होतं. भारतानं तीन पैकी दोन सामने जिंकले होते आणि एक मॅच ड्रॉ झाल्यानं ७ गुण मिळाले होते. इंग्लंडचेही ७ गुण होते मात्र गोलच्या सरासरीमुळं त्यांनी थेट उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता न्यूझीलंड आणि विश्वविजेता बेल्जियम यांच्यात लढत होईल. भारताकडून ललित उपाध्यायनं १७ व्या मिनिटाला गोल केला. २४ व्या मिनिटाला सुखजीत सिंहनं गोल केला. यामुळं भारताला २-० अशी आघाडी मिळाली होती. २८ व्या मिनिटाला न्यूझीलंडनं एक गोल केला. तिसऱ्या हाफमध्येही भारताचं खेळावर वर्चस्व होते. मात्र,४३ व्या मिनिटाला न्यूझीलंडनं आणखी एक गोल केला. तर, भारताकडून वरुण कुमारनं ४० व्या मिनिटाला गोल केला. अखेरच्या हाफमध्ये भारताच्या बचाव फळीच्या मर्यादा दिसून आल्या. न्यूझीलंडला एक गोल करण्यात यश आलं आणि नियमित वेळेत सामना बरोबरीत सुटला. अखेरच्या १० मिनिटात भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही. पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतीयांचं स्वप्न भंगलंपेनल्टी शूटआऊटमध्ये पहिल्या पाच प्रयत्नात दोन्ही संघ बरोबरीवर राहिले. दुसऱ्या वेळी न्यूझीलंडनं आघाडी घेतली आणि टीम इंडियाचा ५-४ असा पराभव झाला. यासह कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5ckduLB
No comments:
Post a Comment