Breaking

Sunday, January 8, 2023

मानवाधिकार आयोगाची महापालिकेला नोटीस; भूलतज्ज्ञांच्या कमतरतेबाबत विचारणा https://ift.tt/JBXIgbE

मुंबई : कोणत्याही आपत्कालीन स्थितीत रुग्णालयामध्ये भूलतज्ज्ञांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. मुंबई महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये भूलतज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतींना इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये भूलतज्ज्ञांची कमतरता आणि समन्वयाच्या अभावामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. तसेच प्रसूतीसाठी सिझेरिअनची गरज असलेल्या गर्भवतींना अन्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. त्यामुळे बाळ व गर्भवतींच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे वास्तव ‘मटा’ने मांडले होते. यावरून राज्य मानवाधिक आयोगाने पालिकेकडे रुग्णालयातील रिक्त पदांची संख्या व ती कधी भरली जातील याची विचारणा केली आहे. यासंबंधी २३ डिसेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीत पालिकेचे सहायक कायदा अधिकारी प्रकाश शेजल उपस्थित होते. दरम्यान, प्रत्येक मोठ्या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञांची गरज असते. त्यांच्याशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. पालिकेच्या आरोग्य विभागात पाच मोठ्या रुग्णालयांसह वैद्यकीय कॉलेजे, तसेच सोळा उपनगरीय रुग्णालयांसह लहान दवाखाने, प्रसूतिगृहे व पाच विशेष रुग्णालयांचा समावेश आहे. यात आवश्यकता असते तिथे भूलतज्ज्ञांची उपलब्धता केली जाते. मात्र समन्वयाच्या अभावामुळे यामध्ये अनेकदा घोळ होत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या डीएनबी या वैद्यकीय अभ्यासाक्रमामुळे भूलतज्ज्ञांची संख्या वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/J4irEIP

No comments:

Post a Comment