Breaking

Tuesday, January 10, 2023

दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवा, ३० लाख मिळवा, श्याम मानव यांचं धीरेंद्र महाराजांना ओपन चॅलेंज https://ift.tt/KvpafWO

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. श्याम मानव यांनी नागपूरमध्ये आलेल्या धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिलं आहे. धीरेंद्र महाराज रामकथा प्रवचनासाठी नागपूरमध्ये आलेले आहेत. त्यांना रामकथेचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याच्या नावाखाली त्यांना दिव्यशक्तीचे दावे आणि प्रयोग करण्याचा अधिकार नाही, असं श्याम मानव म्हणाले. महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार धीरेंद्र महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असं श्याम मानव यांनी स्पष्ट केलं. याशिवाय धीरेंद्र महाराज यांनी दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवल्यास ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं आव्हान देखील श्याम मानव यांनी दिलं. श्याम मानव यांचं धीरेंद्र महाराजांना आव्हान श्याम मानव हे महाराष्ट्रासह देशभर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि समाजातील अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यासाठी कार्यरत आहेत. धीरेंद्र महाराजांनी केलेल्या गुन्ह्यांचा तपशील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. पोलिसांनी जादूटोणाप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्याम मानव यांनी केली आहे. आजपर्यंत दिव्यशक्ती कुणीही सिद्ध करु शकलेलं नाही. महाराज दिव्यशक्ती सिद्ध करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. त्यांनी आव्हान स्वीकारुन आमचं ३० लाखांचं बक्षीस जिंकावं, असं श्याम मानव म्हणाले. धीरेंद्र महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती सिद्ध केल्यास त्यांना शरण जाऊन अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम बंद करेन, असं श्याम मानव म्हणाले. श्याम मानव यांनी यामध्ये कुठेही धर्म किंवा देवाचा विरोध नसून देवाच्या नावाखाली लोकांना फसवलं जात आहे. त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम लोकांना जागरुक करणं हे असल्याचं श्याम मानव म्हणाले. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रामकथेच्या उपस्थितीबाबत विचारलं असता त्यांना या गोष्टी माहिती नसतील. ते अशा गोष्टींचं समर्थन करणार नाहीत, असंही श्याम मानव म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/70d3rVL

No comments:

Post a Comment