Breaking

Tuesday, January 24, 2023

..असा खासदार लातूरकरांनी पहिल्यांदाच पाहिला, सुधाकर शृंगारेंनी चित्रात भरले रंग अन् मुलांचा उत्साह वाढला https://ift.tt/lpoIF0W

अहिल्या कसपटे, लातूर : आजकाल धकाधकीच्या आयुष्यात माणसाचं आयुष्य बेरंग होत चाललं असल्याचं दिसून येतं. उदासीपणाचं मळभ पसरत चालल्यासारखं अनेकांना वाटतं. या परिस्थितीत देशाचं उमलत भविष्य असलेल्या मुलांच्या आयुष्यामध्ये आशेचे रंग भरण्याचं काम लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलं आहे. चक्क मुलांसोबत लहान होऊन चित्रं काढत त्यात सुधाकर शृंगारे यांनी रंग भरले अन् असे खासदार लातूरकरांना पहिल्यांदाच पाहायला मिळाले. त्यांच्या निर्मळ, निखळ मनाचे जणू लातूरकरांना दर्शन झाले आहे. लातूरमधील श्रीनगरमधे असणाऱ्या सुदर्शन शाळेत आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधाकर शृंगारे मुलांसोबत चित्र काढण्यात दंग झाले. त्यांच्या कल्पनेतून मुलांचं लातूर तसच देशाचं उद्याचं चित्रं त्यांनी विविध चित्रातून रेखाटलं आणि त्यात समतेचे रंग भरले. एवढं मोठं व्यक्तिमत्व अपल्यासबोत भविष्याचे रंग भरतायत म्हटल्यावर मुलांमधे उत्साह संचारला. मुलांनीही मोठ्या उत्साहात कल्पनेतील भविष्याची सप्ने रेखाटली. अन् त्यात रंग भरायला सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून '' या कार्यक्रमांतर्गत मुलांवर असणारा परीक्षेचा दबाव कमी होण्यासाठी जिल्ह्यात विविध शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले होते. खासदार सुधाकर शृंगारे यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. त्यापैकी एक श्रीनगरची सुदर्शन शाळा होय. या शाळेत सर्वसामान्यांपासून गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात. शाळेचे अध्यक्ष माने, मुख्याध्यापक श्रीमती देशमुख, प्रवीण माने, तसेच शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत. अशा या शाळेत जाऊन आज सुधाकर शृंगारे यांनी मुलांच्या भविष्याचे रंग भरले. त्यांनी मुलासोबत मुक्त संवाद साधला. मुलांनी कुतूहलाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली अन् विद्यार्थ्याना दिशाही दाखवली.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी या कार्यक्रमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात. नरेंद्र मोदी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी डेहराडूनमधून संवाद साधणार आहेत, अशी माहिती आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HKSqUt

No comments:

Post a Comment