Breaking

Sunday, January 29, 2023

पीव्ही सिंधूने मुंबईत येऊन दिला फिटनेसचा कानमंत्र, 'सन रन २.०' मध्ये नेमकं काय म्हणाली पाहा https://ift.tt/mxWBXGO

मुंबई: भारताची बॅडमिंटन सेन्सेशन असलेली प्रसिद्ध बँडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने आज (२९ जानेवारी) मुंबईत उपस्थिती लावली होती. पीव्ही सिंधू सध्याच्या घडीला क्रीडा विश्वातील आघाडीची बॅडमिंटनपटू आहे. तिने ऑलिम्पिक तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीमध्ये पदके पटकावली आहेत. सध्याच्या घडीला युवकांमध्ये बॅडमिंटन खेळाविषयीची जागरूकता अधिक निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे पीव्ही सिंधू आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बँक ऑफ बडोदा सन रन 2.0 आज मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये संपन्न झाला. भारताची बॅडमिंटन सुपरस्टार तसेच बँक ऑफ बडोदा’ची ब्रँड एंडोर्सर पीव्ही सिंधू आणि बँक ऑफ बडोदाच्या उच्च व्यवस्थापनासह श्री अजय के खुराना, कार्यकारी संचालक, श्री देबदत्त चंद, कार्यकारी संचालक आणि श्री ललित त्यागी, कार्यकारी संचालक या प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईच्या वांद्रा-कुर्ला कॉमप्लेक्स येथील जिओ वर्ल्ड गार्डनवरून शर्यतीची सुरुवात झाली. त्यात १० किमी अंतर निश्चित वेळेत गाठण्याचा बीओबी प्रो रन तसेच ५ किमी अंतर वेळेच्या निश्चित मर्यादेशिवाय कापणे अशा दोन प्रकारच्या शर्यतींचा समावेश होता. त्याशिवाय, बँकेच्या वतीने झुंबा सेशन आणि लाईव्ह डीजे अशा अनेक गुंतवून ठेवणाऱ्या क्रियाकलापांची योजनादेखील आखण्यात आली होती बँक ऑफ बडोदाच्या सन रन च्या या दुसऱ्या आवृत्तीत ३५०० हून अधिक व्यक्तिंनी सहभाग नोंदवल्याने वातावरणात आनंद आणि उत्साहाचा संचार होता. अनेक आकर्षक क्रियाकलापांव्यतिरिक्त झुंबा सत्र आणि गायक, गीतकार आणि संगीतकार प्रवीर बारोट यांच्या लाईव्ह बँड परफॉर्मन्समुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. या शर्यतीमध्ये ११ ते ४५ वयोगट आणि ४५ वर्षांवरील असे वयोगट होते. जिओ वर्ल्ड गार्डनवरील या स्पर्धेत पीव्ही सिंधूने लावलेल्या उपस्थितीने सर्वांचा उत्साह चांगलाच वाढवला होता. या बँक ऑफ बडोदाच्या सन रन 2.0 मधील तिचा अनुभव सांगताना ती म्हणाली, हा अनुभव खरंच खूप चांगला आहे, खूप छान वाटतं आहे की पहाटेपासून अनेक जण या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मला आशा आहे की असंच पुढे राहावं फक्त आजच नाही तर प्रत्येक व्यक्तीने आपण फिट राहावं, निरोगी राहावं यासाठी रोज काही ना काही नक्कीच केले पाहिजे, फिट राहण्यासाठीचा हा कानमंत्र सिंधूने बोलताना दिला.१० किलोमीटर शर्यतीत पुरुष आणि महिला वर्गवारीचे ३ विजेते खालीलप्रमाणे:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0Q15tsU

No comments:

Post a Comment