जळगाव : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे गुहाटीला कसे आले? याचं गुपित खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावच्या सभेत बोलताना उघड केलं आहे. गुलाबराव पाटील यांना माझ्यासोबत येताना खूप अडचणी आल्या. ते कसे आले ते मी सांगत नाही. मात्र जिद्द व चिकाटी असली की ते ध्येय साध्य होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांची तब्येत बरोबर नसतानाही मंत्री गुलाबराव पाटील यांना आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण, गिरीश महाजनांनी प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. ॲम्बुलन्सद्वारे मंत्री गुलाबराव पाटील यांना नेण्यात आल्याचा गौप्यस्फोटही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांनतर जे काय घडलं ते सर्व जगाला माहित आहे. आणि तेव्हापासून लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत लोकांना माहीत झालं की एकनाथ शिंदे कोण आहे ते, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगत गुवाहाटी दौऱ्याचा उल्लेख केला. ... म्हणून तर सरकार आलं, आता लक्षात आलं माझ्या- गुलाबराव पाटील तुम्ही हा कार्यक्रम घेतला असता तर आम्ही एक दोघं जण आलो असतो. पण इंजीन आल्यामुळे सगळे डबे आले. गिरीश महाजनांनाही धावत पळत यावं लागलं. मला तर माहितीही नव्हतं, मुख्यमंत्री येणार ते. साडेदहा अकरा वाजता किशोर अप्पा पाटील यांनी फोन केला. म्हणाले जमतं की नाही जमतं, मला माहित नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला. मुख्यमंत्री येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मग आता पळावं लागेल, असं मी स्वतःला म्हटलं. सगळ्यांची धावपळ उडाली. फक्त चार तासांत सर्व तयारी झाली. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी तारांबळ उडाली. इतक्या वेगात तयारी झाली की आम्हालाही विश्वास बसेना. पण खरंच मानावं लागेल तुम्हाला. म्हणून तर सरकार आलं, आता लक्षात आलं माझ्या, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर एकनाथ खडसेंची टीका मुख्यमंत्री नवस फेडण्यासाठी जळगाव दौऱ्यावर आले आहेत, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण त्यासाठी बैठका घेण्यासाठी मुख्यमंत्री येत नाहीत, असा टोला खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी जरूर यावं. मात्र जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/i94wSq0
No comments:
Post a Comment