मुंबई: साताऱ्याचे बच्चन अशी ओळख असलेले किरण माने बिग बॉस मराठी ४ मधून अखेरच्या दिवशी बाहेर पडले आहेत. किरण मानेंच्या चाहत्यांना यामुळं धक्का बसला आहे. यापूर्वी अमृता धोंगडे, राखी सावंत देखील स्पर्धेबाहेर गेल्या आहेत. बिग बॉस मराठी ४ च्या विजेतेपदाचा मानअक्षय केळकरनं पटकावला. तर, अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली. आक्रमता आणि संथगतीनं खेळत स्पर्धेत राहिले संथ गतीने सुरुवात करत नंतर गेम चेंजर ठरलेल्या किरण मानेंना अखेर बिग बॉसच्या घरातून आणि या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. किरण माने यांनी बिग बॉस मराठी ४ च्या सीझनमध्ये सुरुवातीला आक्रमकपणे खेळ सुरु केला होता. मात्र, नंतर त्यांनी रणनीती बदलली होती. मात्र, अखेरच्या दिवशी बिग बॉस मराठीचं विजेतेपदाचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. किरण मानेंचा प्रवास कसा होता किरण माने यांना बिग बॉसमधील मास्टर माईंड म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी स्पर्धेत आक्रमकपणे सुरुवात केली होती. बिग बॉसमध्ये आक्रमकपणा उपयोगी पडत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी खेळात बदल केला होता. किरण माने यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं होतं. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांना घराबाहेर पडावं लागलं. बिग बॉस मराठीच्या घरात किरण माने १०० हून अधिक दिवस टिकून राहिले होते. अखेर भावूक होतं किरण मानेंनी बिगबॉसचं घर सोडल्याचं दिसून आलं. कलर्स मराठीनं देखील किरण माने यांच्या बिग बॉसमधील खेळाचं वर्णन केलं आहे. संथ गतीने सुरुवात करत नंतर गेम चेंजर ठरलेल्या किरण मानेंना अखेर BIGG BOSS च्या घरातून आणि या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले, असं कलर्स मराठीनं ट्विट करुन म्हटलं आहे. किरण माने हे सातारा जिल्ह्यातील असून नाटक, मालिका आणि चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. सामाजिक आणि राजकीय विषयावर परखडपणे भाष्य करणारे अभिनेते अशी देखील त्यांची ओळख आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ovhdyC3
No comments:
Post a Comment