Breaking

Wednesday, January 18, 2023

तूर आणि कापसाच्या दरात वाढ, सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु, शेतकऱ्यांचं वाट पाहण्याचं धोरण कायम https://ift.tt/Of4RhbF

अकोला : अकोल्यातील अकोट बाजार समितीत तूर आणि कापसाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली असून भाव पुन्हा वाढले आहे. सोयाबीनच्या दरात घसरण पाहायला मिळाली. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तुरीला ६ हजार ९०० पासून ७ हजार ७०० रूपये तर कापसाला ८ हजार २१५ ते ८ हजार ८६० रूपयांपर्यत भाव होता. ७० रुपयांनी तुरीच्या अन् कापसाच्या दरात ८५ रुपयांनी वाढ झाली. कापसाची आणि तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असून लवकरच ९ हजारांचा टप्पा गाठणार शक्यता आहे. कापसाच्या दरातही किंचीत वाढ झाली असून तब्बल ८५ रुपयांनी वाढ झाली आहे. कापसाचा सरकारी दर ६ हजाराच्या जवळपास असून अकोटच्या बाजारात त्यापेक्षा २ हजार रूपयांहून अधिक भाव मिळत आहे. मात्र, गेल्या काळात हा भाव ९ हजारांच्या जवळपास पोहोचला होता. पण त्यानंतर दरात नरमाई येत गेली. मंगळवारी विदर्भातील कापसाची पंढरी समाजाला जाणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी ८ हजार २५० पासून ८ हजार ७७५ रुपयांपर्यंत भाव होता. आज या भावात ८५ रुपयांनी वाढ झाली. परंतू विशेष म्हणजे कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. मंगळवारी २ हजार २ हजार २४० तर बुधवारी २ हजार ८९० क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. आतापर्यंत अकोटच्या बाजारात १०५ क्विंटलहून अधिक कापूस खरेदी झाला आहे. एकीकडं कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात सध्या बाजारातील कापसाची आवक जास्त असून दर वाढणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कापसाच्या दरवाढीवर शेतकरी काय म्हणाले४० एकर कापूस लागवड केली, अतिवृष्टीमुळं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले, त्यातही पीक वाचवलं. आता शेतमाल घरी आला असून या शेतमालाला योग्य भाव मिळणं अपेक्षित होतं. सद्यस्थित घरात कापूस साठवलेला आहे, योग्य भाव आल्यास कापूस बाहेर काढू. आज साधारणता कापासला दहा हजारांवर भाव मिळावा म्हणजे द्यावा, असे नव्या सरकारकडून अपेक्षित आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे शासनाकडून सर्व्हे झालेत, मात्र अद्यापही देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे कापसाच्या दरवाढीची वाट पाहणं हाचं आमच्यासमोर योग्य पर्याय आहे, असे अकोट तालुक्यातील पुंडा गावातील शेतकरी विनायक पुंडकर यांनी 'मटा ऑनलाइन'शी बोलताना सांगितले.तुरीच्या दरात वाढ तर सोयाबीन दरात नरमाई अकोटच्या बाजारात सोयाबीनच्या दरात नरमाई आली आहे. त्यातच शेतकऱ्यांना तुरीला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या तुरीची आवक वाढत आहे. मंगळवारी तुरीची आवक १ हजार ८७० क्विंटल इतकी होती. बुधवारी २ हजार ४६० क्विंटल तूर खरेदी झाली. सध्या तुरीला चांगला भाव मिळत तुरीचे दर ७० रुपयांनी वाढले. ६ हजार पासून ७ हजार ६३० रूपये हा मंगळवार (१७ जानेवारीचा) तुरीचा भाव होता. तर ६ हजार ९०० पासून ७ हजार ७०० रूपये असा बुधवारी तुरीला भाव मिळाला आहे. दरम्यान, सद्यस्थित तुरीचे दर बाजारात टिकून आहेत. तसेच पुढील काळातही तुरीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनला सरासरी ४ हजार ९५५ पासून ५ हजार ५३० रूपयांपर्यत भाव होता. या भावात १५ रुपयांनी घसरण झाली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xZmLFJR

No comments:

Post a Comment