Breaking

Tuesday, January 24, 2023

रोहित शर्माने तीन दिवसांपूर्वीच केली होती शतकाची भविष्यवाणी, पाहा नेमकं काय म्हणाला होता... https://ift.tt/QWn0yFb

इंदूर : रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावले आणि जवळपास तीन वर्षांनी ही सेंच्युरी पूर्ण केली. पण आपण हे शतक झळकावणार, याची भविष्यवाणी ही रोहित शर्माने तीन दिवसांपूर्वीच केली होती.रोहित शर्मा हा शतकांचा दुष्काळ अनुभव होता. कारण रोहितने वनडेमध्ये शेवटचे शतक १९ जानेवारी २०२० मध्ये झळकावले होते आणि त्यानंतर आज २४ जानेवारी २०२३ मध्ये त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली. रोहितने या सामन्याची सुरुवात दमदार केली होती. रोहितने यावेळी ८५ चेंडूंत ९ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर १०१ धावांची खेळी साकारली. पण या सामन्यात आपल्याकडून मोठी खेळी होणार असल्याचे रोहितने यापूर्वीच सांगितले होते.रोहित शर्मा म्हणाला होता की, " मी माझ्या खेळाचा आनंद लुटत आहे आणि मी माझ्या कामगिरीवर संतुष्ट आहे. माझ्या खेळात मी काही बदल करायचे ठरवले आहे. त्यासाठी मी मेहनत घेत आहे. सराव करत असताना मी काही गोष्टी काही गोष्टींचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. मला माहिती आहे की, एक मोठी खेळी माझी वाट पाहत आहे आणि लवकरच माझ्याकडून एक मोठी खेळी घडेल." ही गोष्ट रोहित शर्माने दुसरा वनडे सामना झाल्यावर म्हटली होती. कारण रोहितने त्यावेळी दमदार खेळी साकारली होती, पण त्याला शतकाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली होती.रोहित शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून दडपणाखाली असल्याचे पाहायला मिळत होते. कारण रोहितकडून अर्धशतकी खेळी होत होती, पण या अर्धशतकाचे रुपांतर त्याला शतकामध्ये करता येत नव्हते. त्यामुळे रोहितवर थोडे दडपण असल्याचे म्हटले जात होते. पण हे दडपण रोहितने योग्य पद्धतीने हाताळले आणि त्यामुळेच रोहितला तिसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावण्यात यश आले. सध्याच्या घडीला रोहितला भारताच्या टी-२० संघात स्थान दिलेले नाही. कारण यावर्षी वनडे विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. या विश्वचषकाची तयारी आता भारताने सुरु केली आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटवर लक्ष कायम असावे, यासाठी रोहितला टी-२० संघापासून लांब ठेवण्यात आले आहे. रोहितने आता शतक झळकावले आहे आणि तो चांगल्या फॉर्मात आला आहे. त्यामुळे आता रोहित यापुढे कशी फलंदाजी करतो आणि किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GZ5BUTR

No comments:

Post a Comment