: मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात मंगळवारी एका भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मुख्य आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, तर या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. थौबाल पोलिस अधीक्षक (एसपी) हाबीजम जोगेशचंद्र यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, भाजपच्या राज्य युनिटच्या माजी सैनिक सेलचे संयोजक लैशराम रामेश्वर सिंह यांची सकाळी क्षेत्री भागातील त्यांच्या निवासस्थानाच्या गेटजवळ हत्या करण्यात आली. दोन जण नोंदणी क्रमांक नसलेल्या कारमध्ये आले आणि त्यांनी सिंग यांच्यावर सकाळी ११ वाजता गोळीबार केला, असेही त्यांनी सांगितले. पन्नास वर्षीय सिंह यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.एसपी जोगेश चंद्र यांनी घटनेच्या काही तासांनंतर पत्रकारांना सांगितले की, वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव नौरेम रिकी पॉइंटिंग सिंग असे आहे. त्याला अटक करण्यात आली. बिष्णुपूर जिल्ह्यातील किनाऊ येथील रहिवासी असलेल्या या चालकाला इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील हाओबाम मारक परिसरात पकडण्यात आले. अयेकपम केशोरजीत (४६), या नावाने ओळखल्या जाणार्या मुख्य आरोपीचा पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू केला आणि त्याला इशारा देऊन आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.क्लिक करा आणि वाचा- आरोपींनी केले आत्मसमर्पण त्यानंतर काही वेळातच मुख्य आरोपीने इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कमांडो कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तो हाओबाम मारक येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून एक परवाना असलेले पिस्तूल, दोन मॅगझिन आणि नऊ काडतुसे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून एक काडतूस जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.क्लिक करा आणि वाचा- पोलीस हत्येमागचे कारण शोधत आहेतएसपीने सांगितले की नौरेम रिकी पॉइंटिंग सिंग हे वाहन चालवत होता, तर अयेकपम केशोरजीत याने भाजप नेत्यावर गोळी झाडली. हत्येमागील कारणाबाबत विचारले असता पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.क्लिक करा आणि वाचा- दोषींवर कठोर कारवाई करावीया भ्याड कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सी. चिदानंद सिंह यांनी सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tysaCQU
No comments:
Post a Comment