इंदापूर : मित्राने मित्राच्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध ठेवत त्याला मानसिक त्रास देऊन मारहाण केली. यामुळे त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडली. जावेद जिलानी मुलाणी (वय ३२, रा. बावडा, ता. इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी काजल मुलाणी आणि प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत (रा. बावडा, ता. इंदापूर) यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुस्तफा जिलानी मुलाणी (रा. बावडा, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली.जावेद आणि आरोपी प्रवीण सावंत हे दोघेही शाळकरी मित्र होते. २०१७ मध्ये जावेदचे काजलशी लग्न झाले होते. मित्र असण्यासह पैशांच्या व्यवहारामुळे प्रविणचे जावेदच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातूनच प्रविण आणि काजल यांचे प्रेमसंबंध जुळले. परिणामी पत्नीशी भांडण आणि तणावामुळे जावेद व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या जावेदला दोघा आरोपींकडून सतत मारहाण होत होती.आत्महत्येपूर्वी म्हणजे २० जानेवारीच्या संध्याकाळी आपल्याच घरात दोघांना एकत्र पाहून जावेदने विचारणा केली. यावरून प्रवीणने त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी (२१ जानेवारी) सकाळी १० वाजता घरी येत आरोपीने पुन्हा जावेदला मारहाण केली. परिणामी तणावात असलेल्या जावेदने आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी चॅनलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जी. पाटील करत आहेत.जावेदचा मृतदेह घेऊन नातेवाईक इंदापूर पोलीस ठाण्यातजावेदच्या आत्महत्येनंतर मृतदेह घेऊन त्याच्या नातेवाईकांनी इंदापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. घटनेशी संबंधित दोषींवर योग्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल करू, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरही नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम राहिले. दरम्यान शनिवारी (२१ जानेवारी) रात्री उशिरा वरील दोघा आरोपींवर भा.द.वि. ३०६ कलमांन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qfEVb0w
No comments:
Post a Comment