पुणे: शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि आर्थिक नैराश्यातून एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मुंढवा परिसरात केशवनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. आत्महत्या केलेल्यामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.दीपक थोटे, इंदू थोटे, मुलगा ऋषिकेश थोटे, मुलगी समीक्षा थोटे अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. संबंधित कुटुंबीय मूळचे अमरावतीचे असून दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. मुलाचे वय २१ तर मुलीचे वय १७ होते.हेही वाचा -मुंढवा परिसरात संबंधित थोटे कुटुंब राहत होते. मागील काही दिवसांपासून संबंधित दाम्पत्याने शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यांना तोटा झाल्यामुळे पती-पत्नी आर्थिक समस्येने मानसिक तणावाखाली होते. कौटुंबिक गरजा भागविताना त्यांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी २१ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून नंतर पती- पत्नीने औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.हेही वाचा -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Q6vwkGn
No comments:
Post a Comment