Breaking

Saturday, January 21, 2023

या दिवशीवर पृथ्वीवर संकट येणार; आजपर्यंतची सर्वात घाबरवणारी भविष्यवाणी https://ift.tt/TXDnq1S

मुंबई: नवीन वर्षाची सुरुवात होऊन जेमतेम २१ दिवस झाले आहेत आणि या वर्षाबाबत अत्यंत धडकी भरवणारी भविष्यवाणी पुढे आली आहे. 'द चॅम्पिअन' नावाचा एलियन यावर्षी पृथ्वीवर विध्वंस करणार असल्याची धक्कादायक भविष्यवाणी समोर आली आहे. मार्च २०२३ मध्ये तो तब्बल ८ हजार लोकांना दुसऱ्या ग्रहावर घेऊन जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वत:ला टाइम ट्राव्हलर म्हणणाऱ्या एका व्यक्तीने टिकटॉकवर ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्याच्यानुसार, 'द चॅम्पिअन' नावाचा एलियन पृथ्वीवर येणार आहे.हेही वाचा -टिकटॉकवर radianttimetraveler या नावाने असलेल्या एनो अलारिकने आणखी बरेच मोठे दावे केले आहेत. याच दाव्यांपैकी एक म्हणजे पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला. एनो अलारिकने २०२३ मध्ये होणाऱ्या मोठ्या घटनांची भविष्यवाणी केली आहे. या कथित टाइम ट्रॅव्हलरने असेही म्हटले आहे की, जग लवकरच संपणार आहे आणि काही मोजकेच लोक राहातील. टिकटॉकर अलारिकने ३० डिसेंबर रोजी त्याच्या १,२९,००० फॉलोअर्ससोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने सांगितले की चॅम्पियन नावाचा एलियन पृथ्वीवर आलेला आहे आणि माणसं या एलियन्सला हरवू शकणार नाही. हेही वाचा -या एलियन्स हल्ल्यात आपल्यापैकी काहीच जण वाचू शकतील आणि २३ मार्च २०२३ रोजी हे एलियन्स सुमारे ८,००० लोकांना दुसर्‍या राहण्यायोग्य ग्रहावर घेऊन जातील. यापूर्वी अशी अनेक भाकितं करण्यात आली आहेत, पण याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GBaE6ug

No comments:

Post a Comment