पुणे : यांनी पुण्यात पत्रकारांसोबत विविध विषयांवर संवाद साधला. नुकतंच प्रसिद्ध झालेलं माझं गाणं लोकांना गाणं आवडलं, लोकांनी त्यांला स्वीकारलं. लहान मुलं त्याचे रिल्स करत आहेत, याचा मला आनंद आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. माझा विश्वास आहे, कोणीही काही बोलले तरी काम करत राहिले, असंही त्या म्हणाल्या. यांनी देखील गाणं चागलं झालं, असं सांगितल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. मला पंजाबी गाणं आवडलं म्हणून ते गाणं केलं आहे. मी भजन केलं तरी ट्रोल होते. मला ट्रोल होण्याची सवय झाली असून त्याने मला फरक पडत नाही, असंही त्या म्हणाल्या. लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं मी काम करत आहेत, असंही त्या म्हणाल्या. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ वादावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या? प्रत्येक विषयावर लोकांचे विचार असतात.तुम्ही जे आहात ते तुम्ही आहात,दबून नका जाऊ,पण भान बाळगा,असं अमृता फडणवीस म्हणाल्या. पण, कुठे कसं वागायच आहे याच भान ठेवावं, असंही त्या म्हणाल्या. सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे.तुमचं व्यावसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. महिलाच महिलांना आता मागे ओढतात, चुकीचं बोलत आहेत, हे थांबवलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाल्या. संजय राऊतांवर टीका शिवसेना खासदार यांनी एकनाथ शिंदे यांचं सरकार फेब्रुवारी महिन्यात पडेल असं म्हटलं होतं. त्यावर देखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. सरकारचं काम चांगलं सुरु असून सगळं सुरळीत चालू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना अनुभव आहे. त्यामुळे चांगले निर्णय घेतले जात आहेत, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. मंत्रिमंडळात कोण नाही कोण आहे, त्यांना चांगलं माहिती आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील, असंही त्या म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य जगात सगळ्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर यावं, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काम करावं, असं वाटत असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Gpb97l4
No comments:
Post a Comment