Breaking

Thursday, January 12, 2023

तो पुन्हा उठेल, ती आशेने त्याच्याजवळ तासभर उभी, पण... https://ift.tt/ZwyMjO3

चंद्रपूर: रस्ता ओलांडत असताना वेगवान वाहनाची धडक लागल्याने एका कोल्ह्याचा मृत्यू झाला. रस्त्याच्या दुसऱ्या कडेला उभी असलेली मादा लगेच धावत गेली. तो उभा होईल यासाठी ती तब्बल एक तास ती त्याचाजवळ होती. त्याला उभं करण्यासाठी तिचं लाडानं त्याला गोंजारन, तर कधी मध्येच आकाशाकडे तोंड करुन हंबरडा फोडणं, तिच दुःख बघून पाषणही पाझरावा. अखेर तिला कळालं की आता तो उभा होणार नाही. पानावलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघत हळूहळू दूर निघून गेली. हृदयाला असंख्य टाचण्या टोचव्यां अस हे दृश्य चंद्रपूर जिल्ह्यातील महामार्गावर घडलं.जिल्ह्यातील व्याहाळ गावाजवळून महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत असतात. हा मार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत नर कोल्ह्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्याकडेला मादा कोल्हा उभी होती. रस्त्यावर निश्चित पडलेल्या कोल्ह्याला बघून ती कोल्ह्याजवळ गेली. त्याला उभं करण्यासाठी तिची केविलवाणी धडपड सुरू होती.हेही वाचा - हा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे सदस्य प्रशांत खोब्रागडे यांनी बघितला. ते गडचिरोली इथून चंद्रपूरकडे येत होते. त्यांनी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांना माहिती दिली.खाटे आणि त्यांचे सहकारी नयन कुंभारे, श्रीकांत अडूर यांनी घटनास्थळ गाठलं. नर कोल्हा हा मृतावस्थेत होता. सावली वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विरुटकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. क्षेत्र सहाय्यक चौधरी यांनी घटनास्थळ गाठलं. मृत कोल्ह्याचा पंचनामा केला. वाहनाच्या धडकेत वन्य प्राण्यांच्या मृत्यूत वाढ झाली आहे. ही संख्या वाढत असली तरी याकडे सरकार आणि वनविभाग गांभीर्याने बघत नाही. ही मोठीच शोकांतिका आहे.हेही वाचा -कोल्हा हा प्राणी दुर्मिळ नसला तरी त्याची संख्या कमी होत आहे. गवती प्रदेश, झुडपी जंगल आणि गावाजवळ राहणारा हा प्राणी विविध प्रकारच्या समस्या ना तोंड देत आहे.इतर मांसाहारी प्राण्यांशी स्पर्धा, गवताळ प्रदेश कमी होणे, विकासाची कामे, उद्योग आणि रस्ते अपघात अशा विविध कारणांमुळे ह्या कोल्ह्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे. केवळ वाघाकडे लक्ष देण्यापेक्षा कोल्हा, लांडगा अशा प्राण्यांचे सुद्धा संवर्धन करणे आवश्यक आहे.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/w1zG3WD

No comments:

Post a Comment