नवी दिल्ली: मद्यप्राशन करणाऱ्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. तसंतर दारुचं सेवन करणं हे शरीरासाठी नुकसानदायकच असते. अनेकदा असे अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये मद्य हे किती नुकसानदायक असते हे सांगण्यात आलं आहे. तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करत तेच करतात जे त्यांना करायचं आहे. मात्र आता डब्ल्यूएचओने एक नवा अहवाल जारी केला आहे. यामध्ये डब्ल्यूएचओने तळीरामांना धोक्याचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओ ने सांगितलं की मद्य प्राशन करण्याची कुठली सुरक्षित मर्यादा नाही. कितीही प्रमाणात याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. डब्ल्यूएचओद्वारे लांसेट पत्रिकेत प्रकाशित एका अहवालात हे सांगण्यात आलं आहे. कॅन्सरवर शोध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजन्सीने एस्बेस्टस, विकिरण आणि तंबाखूसोबतच मद्यालाही उच्च जोखिमच्या समूह-१ 'कार्सिनोजेन' मध्ये वर्गीकृत केलं आहे जे जगभरात कॅन्सरचं कारण ठरत आहे.डब्ल्यूएचओ दारुचं सेवन केल्याने तब्बल सात प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. यामध्ये आतड्याचा आणि स्तन कॅन्सर सर्वात सामान्य आहे. डब्ल्यूएचओनुसार, २०१७ मध्ये युरोपियन देशांमध्ये कॅन्सरची २३ हजार नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी ५० टक्के जणांना कॅन्सर होण्याचं कारण हे हलके ते मध्यम म्हणजेच दररोज २० ग्रॅम शुद्ध अल्कोहोलच्या प्रमाणापेक्षा कमी अल्कोहोलच्या सेवनामुळे झाला आहे. संशोधनात असेही आढळून आले आहे की युरोपीय प्रदेशात सर्वात जास्त मद्यपान केले जाते आणि २०० दशलक्षहून अधिक लोकांना अल्कोहोलमुळे कर्करोगाचा धोका असतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HgcZJ8y
No comments:
Post a Comment