Breaking

Wednesday, February 1, 2023

मृत पत्नीचं बॅंक खातं बंद करायला गेले अन् दोन लाख जमा झाले, कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू https://ift.tt/5SKWjpL

सोलापूर: सोलापुरातील शिल्पा गायकवाड महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यांचे पती रवींद्र गायकवाड हे पत्नीच्या नावावर असलेली थोडी रक्कम आपल्या खात्यावर वळवून घेऊ आणि खाते बंद करू या आशेने गेले होते. मात्र, स्टेट बँकेच्या मॅनेजरने सर्व चौकशी करून, प्रधानमंत्री जीवन योजने अंतर्गत दोन लाख रुपयांची रक्कम वळता केली. बँक मॅनेजर यांनी केलेल्या कार्याबाबत रवींद्र गायकवाड यांना काही वेळ विश्वासच बसला नव्हता. पण, बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री जीवन योजनेबाबत सर्व माहिती सविस्तर सांगितली. खाते बंद करायला गेले आणि वारसांच्या नावे दोन लाख रुपये जमा झाल्याने मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले.हेही वाचा -महिन्याभरापूर्वी शिल्पा गायकवाड यांचा मृत्यूरवींद्र गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर चार सोलापूर) हे बिगारी कामगार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. रवींद्र गायकवाड यांची पत्नी शिल्पा गायकवाड या सोलापुरातील रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. एक महिन्यापूर्वी शिल्पा गायकवाड यांचे आकस्मित निधन झाले. शिल्पा गायकवाड यांचा मोठा आधार यांच्या कुटुंबाला होता. शिल्पा यांचे निधन झाल्याने संपूर्ण परिवाराची परवड सुरू झाली. आईविना मुलांचं कसं होणार याची चिंताशिल्पा गायकवाड यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काळाने या लहान चिमुकल्यांच्या आईची माया काढून घेतली होती. घरची परिस्थिती नाजूक होती अशातच काळाने घात केला आणि आई शिल्पा गायकवाड याला या लेकरांपासून हिरावून घेतले. पत्नीचं निधन झालं, आपण रस्त्यावर आलो, लेकरांचं कसं होणार, असे प्रश्न पती रवींद्र गायकवाड यांच्या ध्यानीमनी येत होते.हेही वाचा -त्नीच्या निधनानंतर स्टेट बँकेच खाते बंद करायला गेलेरवींद्र गायकवाड यांच्या लक्षात आले की पत्नी शिल्पा गायकवाड यांचे सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते उघडले आहे. त्या अकाउंटमध्ये काहीतरी पैसे शिल्लक असेल, जेणेकरून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होईल. या आशेने पती रवींद्र गायकवाड आणि मित्र यशवंत हे दोघे मिळून सात रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँक येथे पोहोचले आणि त्यांनी स्टेट बँक येथील शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांना माझा पत्नीचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या पत्नीच्या अकाउंटवरील पैसे मला ट्रान्सफर करून द्या आणि अकाउंट बंद करा अशी विनंती केली होती.बँक मॅनेजरने स्टेटमेंट चेक करून विमा पॉलिसीबाबत माहिती दिलीस्टेट बँकचे शाखा अभियंता यांनी सदर महिला शिल्पा गायकवाड यांचे स्टेटमेंट चेक केले असता त्यांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये खातं सुरू करताना प्रधानमंत्री जीवन विमा हे काढलेले होतं आणि हे शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांच्या निदर्शनास आले. प्रधानमंत्री जीवन विमा योजना म्हणजे वर्षाला ४३६ रुपये आपल्या बँक खात्यातून सदर प्रधानमंत्री जीवन योजनेमध्ये वर्ग केले जातात आणि खाते धारकाचे निधन झाले तर वारसाला दोन लाख रुपये मिळतात. शिल्पा गायकवाड यांनी प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा लाभ घेतलेला होता.हेही वाचा -बँक मॅनेजरने दोन लाख रुपये जमाबँक मॅनेजर यांनी माहिती देत सांगितले की, या योजनेअंतर्गत २ लाख रुपये मिळेल, असे सांगितले. हे ऐकताच रवींद्र गायकवाड यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांचे डोळ्यात आनंदाश्रू आले. मृत पत्नीचे बँक खाते बंद करण्यासाठी आले होते, परंतु त्यांच्या नशिबी दोन लाख रुपये होते, याचा त्यांना आनंद झाला. दरम्यान, त्यावेळी शाखा अधिकारी यांनी सदर कागदपत्र बँकेत जमा करा असे सांगितले. शाखा अधिकारी यांनी स्वतः प्रयत्न करून प्रधानमंत्री जीवन युवा योजनेकडे सर्व कागदपत्र पाठवले आणि दोन लाख रुपये या गरीब कुटुंबाला मिळवून दिले. दोन लाख रुपये मुलींच्या नावे फिक्स्ड डिपॉझिटशाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली असता बँक अधिकाऱ्यांनी रवींद्र गायकवाड यांना सदर रक्कम तीन मुलींच्या नावाने एफडी करून देण्यात आली. भविष्यात मुलींच्या लग्नासंदर्भात किंवा शिक्षणासंदर्भात लाभ घेता येईल. असे शाखा अधिकारी यांनी रवींद्र गायकवाड यांना सांगितले आणि त्यावेळेस रवींद्र गायकवाड यांनी देखील होकार दिला. अखेर आज या गरीब कुटुंबाला आधार मिळाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qvSnOca

No comments:

Post a Comment