: राष्ट्रीय नफेखोरी विरोधी प्राधिकरणानं हैदराबादमधील मिराज एंटरटेनमेंट लिमिटेडची मालकी असलेल्या शालिनी शिवानी चित्रपटगृहाला दणका दिला आहे. दोन प्रेक्षकांकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश प्राधिकरणानं चित्रपटगृहाला दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी चित्रपटगृहानं एका तिकिटामागे प्रत्येकी ११.७४ रुपये अधिक आकारले होते. याविरोधात दोन ग्राहकांनी तक्रार दाखल केली. आता या दोघांना १८ टक्के व्याजदरानं भरपाई मिळेल. यासोबतच सरकारच्या ग्राहक कल्याण निधीत १२.८१ लाख रुपये जमा करावे लागणार आहेत.हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेले दोघे ३ वर्षांपूर्वी चैतन्यपुरी मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या शालिनी शिवानी चित्रपटगृहात गेले होते. त्यावेळी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणला होता. मात्र तरीही चित्रपटगृहानं बेस प्राईज कमी केली नव्हती. चित्रपटगृहानं एक्झिक्युटिव्ह तिकिटामागे ११.७४ रुपये आणि गोल्ड कॅटेगरीतील तिकिटीमागे १६.०६ रुपये जास्त आकारले. चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या दोघांनी याविरोधात राष्ट्रीय नफेखोरी विरोधी प्राधिकरणात धाव घेतली. त्यांनी शालिनी शिवानी चित्रपटगृहात तक्रार दाखल केली. चित्रपटगृहाच्या मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकिटांमधून होणाऱ्या कमाईतील ४९.५ टक्के हिस्सा वितरकांना जात होता. तर ५०.५ टक्के म्हणजेच ५.५३ लाख रुपये कंपनीनं स्वत:कडे ठेवले. जीएसटीमध्ये झालेल्या कपातीचा लाभ प्रेक्षकांना न दिल्याची कबुली कंपनीनं दिली. नफेखोरी विरोधी प्राधिकरणानं मिराज एंटरटेनमेंट लिमिटेडला १२.८७ लाख रुपये केंद्र आणि तेलंगणा सरकारच्या ग्राहण कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. प्राधिकरणानं दोन्ही निधीत जमा करण्याचे आकडेही कंपनीला कळवले आहेत. त्यानुसार मिराज एंटरटेनमेंट लिमिटेडला केंद्राच्या ग्राहक कल्याण निधीत ६.४० लाख रुपये आणि तेलंगणाच्या ग्राहक कल्याण निधीत ६.४१ लाख रुपये जमा करतील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aIGBfD4
No comments:
Post a Comment