वॉशिंग्टन: अमेरिकन जातीचा कोंबडा अचानक हिंसक झाला आणि त्याने एका व्यक्तीचा जीव घेतला. ज्या व्यक्तीला कोंबड्याने मारलं ती व्यक्ती हार्ट पेशंट होती. ही घटना गेल्या वर्षीची असल्याची माहिती आहे. मात्र, चौकशी समितीच्या अहवालात आता नवीन माहिती समोर आली आहे. त्याच्या शेजाऱ्याने त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्नही केला होता, पण तो अयशस्वी ठरला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.आयरिश परीक्षकाने न्यायालयीन चौकशीवर आधारित आपला अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, २८ एप्रिल २०२२ रोजी जॅस्पर क्रॉसवर ब्राहमा कोंबड्याने (कोंबडा) हल्ला केला होता. जॅस्पर हा आयर्लंडमधील किल्होर्नियाचा रहिवासी होता. केसचा साक्षीदार आणि जॅस्परचा शेजारी कोरी ओ कीफने सांगितलं की, तो ओरडत होता, मला त्याचा पाय रक्ताने माखलेला दिसला. त्याच्या पायातून रक्त येत होते.कोंबडीने केलेलं कृत्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी ताबडतोब आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला, असं कोरी यांनी सांगितलं. तसेच, त्यांनी जॅस्पर जखमेवर मलमपट्टी केली. त्याला २५ मिनिटं सीपीआर दिला. सुमारे २५ मिनिटांनी रुग्णवाहिका आली. ते दृश्य आठवून आजही कोरी हादरुन जातो. जेव्हा जॅस्पर क्रॉस हे शुद्धीवर आले तेव्हा त्याने एक शब्द उच्चारला होता की, रुस्टर, म्हणजेच कोंबडा.घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जॅस्पर क्रॉस किचनच्या फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या पायाच्या मागच्या बाजूला मोठी जखम झालेली होती. जॅस्परवर ब्राहमा प्रजातीच्या कोंबड्याने हल्ला केला होता. डॉ. रमजान शतवान यांनी सांगितले की, जॅस्परचा चेहरा रक्ताने माखलेला होता. डॉक्टरांनी दावा केला की जॅस्परचा मृत्यू कार्डियाक अॅरिथमियामुळे झाला होता. मृत्यूनंतर जॅस्परचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला. युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UjD93mi
No comments:
Post a Comment