Breaking

Thursday, February 2, 2023

कॉलेजच्या बाहेरच दोघांनी विद्यार्थ्याला गाठलं, चाकू काढला अन्... चेंबूर हादरलं... https://ift.tt/CYiQ9Nz

मुंबई: चेंबूर येथील स्वामी विवेकानंद काॅलेजच्या बाहेरच दोन विद्यार्थांनी चाकूने वार करून एका विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी घडली. मुदस्सर शेख (वय १९)असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याची हत्या करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. स्वामी विवेकानंद काॅलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणारा मुद्दसर गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काॅलेजजवळ गेला होता. यावेळी दोघेजण त्या ठिकाणी आले आणि बेसावध असलेल्या मुद्दसर याच्यावर चाकूने वार करून पळून गेले. रक्तस्त्राव झाल्याने त्याचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्याच्यावर हल्ला करणारे काॅलेजचेच विद्यार्थी असल्याचा संशय पोलिसांना आहे. इतकेच नाही तर एका मुलीवरून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.हेही वाचा -भांडूप येथील सीएचा इगतपुरीत मृत्यूबुधवारी मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडूप येथील चार्टर्ड अकाऊंटंटने नाशिकच्या इगतपुरीमध्ये जाऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली होती. इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये जाऊन या व्यक्तीने जीव दिला. चिराग वरैया या ४५ वर्षांच्या व्यक्तीने रिसॉर्टमध्ये आयुष्य संपवलं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याविरोधात भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.हेही वाचा - चिराग यांनी यावेळी त्या रिसॉर्टमधील खोलीत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाची माफी मागितली. तसेच मुलांचा नीट सांभाळ कर असा संदेश पत्नीसाठी लिहिला. साप्ताहिक सुट्टीत आराम करायचा आहे म्हणून ते इगतपुरी येथील रिसॉर्टमध्ये गेले होते. हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vTzmB7n

No comments:

Post a Comment