Breaking

Monday, February 20, 2023

जय शहा... फक्त महिलांच्या लीग नको तर टॉइलेट्स स्वच्छ करा, पाहा काय घडलं https://ift.tt/dIDRJ5h

मुंबई : बीसीसीआय सध्याच्या घडीला महिलांची आयपीएल () च्या आयोजनामध्ये गुंग आहे. महिलांची लीग कशी मोठी करता येईल, याकडे बीसीसीआय लक्ष देत आहे. पण दुसरीकडे मात्र सामान्य महिला फॅनने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यापुढे महिलांची व्यथा मांडली आहे.बीसीसीआय फक्त महिला क्रिकेटच्या चमकदार गोष्टी दाखवत आहेत, पण दुसरीकडे पायाभूत सुविधांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. कारण वुमन्स क्रिकेट पाहण्यासाठी ज्या महिला फॅन आल्या होत्या, त्यांना वानखेडे आणि फिरोझशाह कोटला सारख्या जागतिक दर्जाच्या स्टेडियमवर वाईट अनुभव आहेत. शिल्पा फडके या असाच एक महिला क्रिकेटच्या चाहत्या आहेत आणि त्यांनी आपली व्यथा ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे.शिल्पा फडके यांनी आणि यांना टॅग करत आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " मी एक क्रिकेटची चाहती आहे. मी आणि माझी मुलगी गेल्या १४ महिन्यांमध्ये दोन मोठ्या शहरांमध्ये महिला क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेलो होतो. पण आम्हाला यावेळी वाईट अनुभव आला. कारण दोन्ही मैदानात प्रसाधनाची व्यवस्था फारच वाईट होती. मुंबईतील बहुतांशी प्रसाधनगृहांना टाळे असल्याचे मला पाहायला मिळाले. त्यामधील एका प्रसाधनगृहामध्ये मी आणि माझी मुलगी गेलो होतो पण ते प्रसाधनगृह अस्वच्छ होतं. तिथे फ्लशमध्ये पाणी नव्हतं, टीश्यू पेपर्स नव्हते. हे सर्व पाहिले आणि सामना संपेपर्यंत पाणी पिऊच नकोस, असा सल्ला मी माझ्या आठ वर्षांच्या मुलीला दिला. दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियममध्ये तर ओपन टॉयलेट्स होते. तिथे फ्लशचा पत्ताच नव्हता. स्वच्छ आणि सुरक्षित प्रसाधनगृह असणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण तसे मात्र भारताच्या या स्टेडियम्समध्ये दिसले नाही."एकिकडे बीसीसीआय महिलांची टी-२० लीग भरवत आहे. या लीगचा लिलावही झाला. खेळाडूंना करोडो रुपये मिळाले. पण हे सामने पाहायला येणाऱ्या महिला चाहत्यांचे काय? या प्रश्नाचे उत्तर आता बीसीसीआय आणि जय शहा यांनी द्यायला हवे. त्यामुळे फक्त महिला क्रिकेटला चालना मिळण्यासाठी त्यांच्या लीग नको, तर चाहत्यांच्या मुलभत सुविधांचाही विचार बीसीसीआयने करायला हवा.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nVpegKA

No comments:

Post a Comment