Breaking

Sunday, February 19, 2023

बदली यादीत मृत शिक्षकाचेही नाव? ऑनलाइन बदली प्रक्रियेतील सावळा गोंधळ उघड, काय आहे प्रकार https://ift.tt/6YOfyJh

म. टा. वृतसेवा,पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेतील सावळा गोंधळ उघड झाला आहे. या यादीमध्ये दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या शिक्षकाची बदली करून यंत्रणेने कळस केला आहे. या प्रकाराने शिक्षण विभागाच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे निघाले आहेतअसा आहे प्रकारजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांची प्रक्रिया सुरू आहे. ही बदली प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांची माहिती योग्य प्रकारे दिली जाणे आवश्यक आहे, मात्र शिक्षण विभागाकडून या प्रक्रियेत चांगलाच गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या बदल्यामध्ये इंग्रजी आणि गुजराती माध्यमांच्या शिक्षकांना पसंती भरण्याची मुभा मिळालीच नसल्याचे बाब समोर आली आहे. बदल्या करण्यासाठी जिल्ह्यात या माध्यमांच्या नियमानुसार तीस शाळा आवश्यक असतात. त्या नसल्याने संबंधित बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय काही शिक्षकांनी बदलीसाठी अर्जच केले नसतानाही त्यांची नावे ऑनलाइन यादीत आली आहेत.प्रक्रियेच्या यादीत दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या शिक्षकाची ही बदली करण्याचा प्रतापही यंत्रणेने केला आहे. बदली करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव बाबू दिघा असे आहे. त्यांचे १३ डिसेंबर २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. जव्हारचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठवणे आवश्यक होते. त्यांनी ती पाठवली आहे का, असेल तर शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, जव्हारच्या गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्याशी या संदर्भात संपर्क केला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6SfhyFm

No comments:

Post a Comment