Breaking

Tuesday, February 7, 2023

२१ वर्षांच्या तरुणीला १५ वर्षांची मुलगी... कहाणी ऐकून चक्रावाल, पाहा नेमकं प्रकरण काय? https://ift.tt/ejqxoYN

नवी दिल्ली: हंटर नेल्सन नावाच्या एका तरुणीने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने जे रहस्य उघड केलं आहे त्याने सारेच हैराण झाले आहेत. या २१ वर्षीय तरुणीला एक किशोरवयीन मुलगी आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण चकित झाले आहेत. २१ वर्षीय हंटर नेल्सन या तरुणीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीला एक १५ वर्षांची मुलगी आहे. हे ऐकून नक्कीच तुम्हालाही धक्का बसला असेल. एखाद्या २१ वर्षांच्या मुलीला १५ वर्षांची मुलगी कशी असू शकते, हे कसं शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडल आहे. त्यामुळेच आतापर्यंत ८२ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे की वयाच्या ६ व्या वर्षी एखाद्या मुलीने बाळाला जन्म कसं दिला असेल.हेही वाचा -हंटर नेल्सनने या व्हिडिओमध्ये सांगितले की, जेव्हा ती तिच्या मुलीच्या शाळेत गेली, तेव्हा तिला कुणीही गांभीर्याने घेतलं नाही. तिथे तिला लोकांनी विचारलं की ती कोणत्या वर्गात शिकते? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिला विचारु लागले की सहाव्या वर्षी कोणी बाळाला जन्म कसं देऊ शकतं. हेही वाचा -हंटरने जेव्हा तिची कहाणी सांगितली तेव्हा अनेकांनी तिचं कौतुक केलं. २०१५ मध्ये हंटरच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तिच्या सावत्र बहीण ग्रेसीनेही तिच्या आईला गवामलं. जेव्हा हंटरला कळालं की तिच्या सावत्र बहिणीला फॉस्टर होमला पाठवलं जाऊ शकते तेव्हा तिने तिच्या पालकत्वासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. सुरुवातीला ग्रेसीने हंटरसोबत राहण्यास नकार दिला. मात्र, काही काळाने ती तयार झाली आणि हंटर तिची आई झाली.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MvRE8c4

No comments:

Post a Comment